आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडचे फॅशन फोटोग्राफर डब्बू रत्नानींच्या आईची श्रद्धांजली सभा, कलाकारांनी वाहिली आदरांजली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर डब्बू रत्नानी यांच्या मातोश्री प्रभा रत्नानी यांचे गुरुवारी निधन झाले. प्रभा दीर्घकाळापासून आजारी होत्या. रविवारी खार येथे प्रभा रत्नानी यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. सनी लिओनी आणि तिचा पती डेनियर वेबर, चंकी पांडे, संगीतकार सलीम, फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा, किम शर्मा, रागिनी खन्ना, प्रिती झांगियानी आणि तिचा पती प्रवीन डबास यांनी श्रद्धांजली सभेला उपस्थिती लावून डब्बू आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.  गुरुवारी स्वतः डब्बू यांनी त्यांच्या आईच्या निधनाची माहिती दिली होती. आईचा फोटो शेअर करत, रेस्ट इन पीस मॉम, असे ट्वीट त्यांनी केले होते. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी डब्बू यांच्या आईच्या निधनावर दुःख व्यक्त केले होते. डब्बू हे बॉलिवूडचे प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर आहेत. सेलिब्रिटी कॅलेंडरसाठी ते ओळखले जातात. दरवर्षी वेगवेगळ्या थीमवर ते कॅलेंडर लाँच करत असतात. अमिताभ बच्चन, सलमान खान, आलिया भट, शाहरुख खान, रणवीर सिंह, करीना कपूरसह बॉलिवूडचे अनेक सेलेब्स त्यांच्या कॅलेंडरवर झळकले आहेत.    

बातम्या आणखी आहेत...