Home | News | bollywood hottest couple disha patani and tiger shroff broken up, claims sources

बॉलीवूडच्या सर्वात हॉट जोडप्याचे ब्रेक-अप! दिशा आणि टायगरने घेतला वेगळे होण्याचा निर्णय

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 24, 2019, 04:56 PM IST

या कपलने रिलेशनशिपवर कधीच भाष्य केले नाही, आता ब्रेक-अपवर करणार का?

  • bollywood hottest couple disha patani and tiger shroff broken up, claims sources

    मुंबई - बॉलीवूडचा सर्वात हॉट कपल म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या दिशा पाटणी आणि टायगर श्रॉफ यांचे ब्रेक-अप झाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असतानाही त्यांनी उघडपणे आपल्या प्रेमावर भाष्य केले नाही. त्यातच पिंकविलाच्या वृत्तानुसार, दोघांनी एकमेकांपासून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे. संकेतस्थळाच्या वृत्तानुसार, या दोघांच्या एका खास मित्राने ब्रेक-अप संदर्भात अधिकृत माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये एका गोष्टीवर वाद झाला होता.


    पिंकविलाच्या वृत्तानुसार, काही आठवड्यांपूर्वी दोघांनी ब्रेक-अप करण्याचा सहमतीने निर्णय घेतला होता. याची जाणीव त्यांच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींना होती. दिशा किंवा टायगरकडून यासंदर्भात काहीही जाहीर करण्यात आले नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे, त्यांनी रिलेशनशिपमध्ये असताना सुद्धा कधीच एकमेकांवर प्रेम करत असल्याची कबुली दिली नव्हती. मीडियाशी संवाद साधताना कित्येक मुलाखतींमध्ये त्यांनी आपण केवळ फ्रेंड्स असल्याचे म्हटले होते. त्यामुळे, ब्रेक-अपची माहिती ते जाहीर करतील याची शक्यता फारच कमी आहे. दिशा आणि टागरच्या ब्रेक-अपचे वृत्त एक सस्पेंस राहणार का असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला असावा.

Trending