आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bollywood Is Ready To Host Many Multi Starer Movies This Year

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेक्षकांनी नाकारल्यानंतरही यंदाच्या वर्षी प्रदर्शित होतील अनेक मल्टिस्टारर चित्रपट, तानाजी-ब्रह्मास्त्रचा समावेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - मागच्या वर्षी बाॅलीवूडमध्ये कित्येक मल्टिस्टारर चित्रपट प्रदर्शित झाले होते, ज्यातील बहुतांश फ्लॉप झाले. यात 'वेलकम टू न्यूयॉॅर्क', 'साहेब, बीवी और गँगस्टर', 'फन्ने खां', 'पलटन' आणि 'भैयाजी सुपरहिट' सारख्या चित्रपटांना प्रेक्षकांनी पसंती दिली नाही. इतकेच नव्हे, गतवर्षी तीन मोठे मल्टिस्टारर चित्रपट 'रेस 3'(सलमान खान), 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' (आमिर खान) आणि 'झीरो' (शाहरुख खान) फ्लॉप झाले. तरीदेखील निर्माते या वर्षीही अनेक मल्टिस्टारर चित्रपट घेऊन येत आहेत. 

 

यावर्षी प्रदर्शित होणाऱ्या मोठ्या मल्टिस्टारर चित्रपटात पाच पीरियड चित्रपट, दोन कॉमेडी चित्रपट आहेत तर करण जोहरचे 'कलंक' आणि 'तख्त'हे दोन मोठ्या बजेटचे चित्रपट आहेत. कलंकचे चित्रीकरण सुरू झाले आहे आिण तख्तचे चित्रीकरण या वर्षी सुरू होणार आहे. याशिवाय 'हाऊसफुल ४' आणि 'टोटल धमाल' कॉमेडी फ्रँचायझीचे चित्रपट आहेत. 

 

या वर्षी प्रदर्शित होतील मल्टिस्टारर चित्रपट 
'कलंक' 

कास्ट - संजय दत्त, माधुरी दीक्षित, आलिया भट, वरुण धवन, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर आणि कुणाल खेमू. 

 

'टोटल धमाल' 
कास्ट - अनिल कपूर, माधुरी दीक्षित, अजय देवगण, अर्शद वारसी, रितेश देशमुख, ईशा गुप्ता, बोमन इराणी, संजय मिश्रा आणि राजपाल यादव

 

'तख्त' 
कास्ट - रणवीर सिंह, करिना कपूर, विक्की कौशल, आलिया भट, अनिल कपूर, भूमी पेडणेकर आणि जान्हवी कपूर 

 

'हाउसफुल 4' 
कास्ट - अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, कृती सेनन, कृती खरबंदा, पूजा हेगडे, राणा दग्गुबाती, चंकी पांडे आिण बोमन इराणी. 

 

'ब्रह्मास्त्र' 
कास्ट - रणबीर कपूर, आलिया भट, अमिताभ बच्चन, मौनी रॉय, नार्गाजुन, डिंपल कापडिया आणि दिव्येंदू शर्मा. 

 

'तानाजी' 
कास्ट - अजय देवगण, काजोल, सैफ अली खान, जगपती बाबू, पंकज त्रिपाठी. 

 

'मिशन मंगल' 
कास्ट - अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, शरमन जोशी, नित्या मेनन, कीर्ती कुल्हारी आणि संजय कपूर. 

 

 

कोणत्या दिग्दर्शकाने किती मल्टिस्टारर चित्रपट केले 

जेपी दत्ता 
'बॉर्डर', 'एलओसी कारगिल', 'पलटन' सह 7 मल्टिस्टारर चित्रपट बनवले. ते या प्रकारच्या चित्रपटांसाठीच प्रसिद्ध होते. 


इंद्र कुमार 
'इश्क', 'मस्ती', 'धमाल' सह अनेक विनोदी चित्रपट दिग्दर्शित केले. अशा विनोदी चित्रपटांची सुरुवात यांनीच केली. 

यश चोप्रा 
'वक्त' 'दीवार' 'कभी-कभी' 'त्रिशूल' 'दिल तो पागल है' आणि 'वीर-जारा' समवेत १५ मल्टिस्टारर चित्रपट. 

करण जोहर 
'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम' आणि 'बॉम्बे टॉकीज' सह 6 मल्टिस्टारर चित्रपट दिग्दर्शित केले. 

पहिला मल्टिस्टारर चित्रपट 
वक्त (1965) 

यश चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटात सुनील दत्त, राज कुमार, शशी कपूर, बलराज साहनी, साधना, शर्मिला टागोर, अचला सचदेव, मदन पुरी आणि रहमान हे कलावंत एकत्र दिसले होते. असे म्हटले जाते की, या चित्रपटापासूनच मल्टिस्टारर चित्रपटांचा जमाना आला.