आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Aishwarya Rai Bachchan To Rani Mukherjee And Kareena Kapoor To Tina Ambanis Regular Customer Of Bollywood Mehndi Queen Veena Nagda

ऐश्वर्या-राणीपासून टीना अंबानीपर्यंत, करवा चौथसाठी अभिनेत्रींच्या हातावर मेंदी काढते ही महिला, या आहेत रेग्युलर कस्टमर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. बॉलिवूड अभिनेत्री या वेळोवेळी विविध कार्यक्रमांवेळी हातावर मेंदी काढत असतात. त्यांची ही सुंदर मेंदी एकच महिला काढते. या मेंदी आर्ट्स्टचे नाव वीना नागदा आहे. नुकतीच करवा चौथ होऊन गेली. या दिवशीही सर्व आघाडीच्या अभिनेत्रींनी आणि अभिनेत्यांच्या पत्नींने वीना यांच्याकडून मेंदी काढून घेतली. विशेष म्हणजे राणी मुखर्जी येथे पोहचली, वीनाने राणीसोबतचा मेंदी काढतानाचा फोटो शेअर केला. फक्त राणी नाही तर काजोल- शिल्पा शेट्टी, करीना कपूर, ऐश्वर्या राय, टीना अंबानीसोबतच अनेक सेलेब्स आणि बिझनेसमनच्या पत्नी-मुली आणि सूना या वीना यांच्याकडून मेंदी काढून घेतात. वीना या बॉलिवूड सेलेब्सच्या मेंदी काढण्यासाठी खुप प्रसिध्द आहेत. करण जोहर वीना यांना मेंदी क्वीन म्हणून बोलावतात. 


अनेक चित्रपटांमध्ये मेंदी डिझायनर म्हणून केले आहे काम 

- वीना यांनी बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये मेंदी डिझायनर म्हणून काम केले आहे. यामध्ये 'कभी खुशी कभी गम', 'कल हो न हो', 'मेरे यार की शादी है', 'गॉड तुस्सी ग्रेट हो', 'यू मी और हम', 'पटियाला हाउस', 'ये जवानी है दिवानी', 'ऐ दिल है मुश्किल'  या चित्रपटांचा समावेश आहे. 
- डिंपल कपाडिया, माधुरी दीक्षित, ट्विंकल खन्ना, श्वेता बच्चन, फराह खान, नेहा धूपिया, शिल्पा शेट्टी, प्रिती झिंटा, नीता अंबानी, प्रियांका चोप्रा, स्वरा भास्कर, करिश्मा कपूर, सुनीता कपूर, साक्षी धोनी या वीना यांच्या रेग्युलर कस्टरमर्स आहेत. 


3 दशकांपासून मेंदी काढत आहेत वीना 

- मेंदी आर्टिस्ट वीना नागदाने 30 वर्षांपुर्वी आपल्या करिअरची सुरुवात केली होती. वीना वर्ल्डची बेस्ट मेंदी आर्टिस्ट आहे. वीना यांचा जन्म मुंबईतील मध्यमवर्गीय कुटूंबात झाला होता.
- अभ्यासात हुशार असूनही आर्थिक कारणांमुळे त्याचे 10 वी नंतर शिक्षण होऊ शकले नाही. नंतर त्यांनी मेंदी बिझनेसमध्ये पाऊल ठेवले आणि त्या यशस्वी झाल्या. 
- वीना ब्रायडल मेंदीमध्ये एक्सपर्ट आहेत, नेल पॉलिश, शेडेड, हीरा-मोती, जरदोजी, अरेबिक, ब्लॅक मेंदी, स्टोन अँड डायमंड मेंदीसाठी त्या ओळखल्या जातात. या आर्टमुळे विदेशामध्ये त्यांचे मोठे नाव आहे. 

 

अनेक वर्षे श्रीदेवीच्या हातावर काढली मेंदी 
- श्रीदेवीच्या निधनानंतर वीना यांनी त्यांच्यासोबतचे अनेक मेमोरेबल फोटोज शेअर केले आहेत. वीना यांनी सांगितले की, श्रीदेवी या करवा चौथची मेंदी काढण्यासाठी खुप एक्सायटेड असायच्या. प्रत्येक वर्षी त्या माझ्याकडून मेंदी काढून घ्यायच्या.
- वीना यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, "श्रीदेवी प्रत्येकवर्षी करवा चौथला माझ्या हातून मेंदी काढून घ्यायच्या. आपल्या आईप्रमाणेच खुशी आणि जान्हवीलाही मेंदी काढायला आवडते. जान्हवी दोन-तीन वर्षांची होती तेव्हापासून मी श्रीदेवींच्या हातावर मेंदी काढत होते."

 

 

बातम्या आणखी आहेत...