आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकुमार रावपासून आयुष्मान खुरानापर्यंत, 2018 मध्ये बॉलिवूडच्या खानलाही वरचढ ठरले हे छोटे स्टार्स, या वर्षात सर्वात जास्त नफा मिळवणा-या चित्रपटांमध्ये सलमान-शाहरुखचा एकही नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. 2018 हे वर्ष संपण्यासाठी अवघे 9 दिवस उरले आहेत. यावर्षी बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपट आले. 2018 हे छोट्या बजेटच्या चित्रपटांच्या यशासाठी नेहमीच लक्षात ठेवले जाईल. नफ्याच्या हिशोबाने यावर्षी टॉप-10 मध्ये कमी बजेटच्या 7 चित्रपटांचा समावेश आहे. या चित्रपटांनी खुप चांगला नफा कमावला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे बजेट 50 कोटींपेक्षाही कमी होते. यामध्ये स्त्री, बधाई हो, सोनू के टीटू की स्वीटी, राजी आणि अंधाधुनसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. 

 

2018 मध्ये सर्वात जास्त कमाई करणा-या चित्रपटांमध्ये कमी बजेटच्या चित्रपटांचा समावेश आहे. आयुष्मानचा 'बधाई हो' चित्रपट सध्या सर्वात प्रॉफिटेबल असणारा दूसरा चित्रपट आहे. पण ज्या गतीने या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे, हे पाहून चित्रपट लवकरच एक नंबरच्या स्थानावर येईल असे दिसतेय. सध्या एक नंबरला 'स्त्री' हा चित्रपट आहे. जवळपास 20 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या 'स्त्री'ने 129.67 कोटींची कमाई केली आहे. म्हणजेच स्त्रीला 548 टक्के प्रॉफिट झाला आहे. तर 'बधाई हो'ला 501 टक्क्यांचा फायदा झाला आहे. हा चित्रपट दूस-या स्थानावर आहे. विशेष म्हणजे सर्वात जास्त फायदा मिळणा-या चित्रपटांमध्ये तिन्ही खान(सलमान, आमिर,शाहरुख) यांचा एकही चित्रपट नाही. आम्ही तुम्हाला आज 2018 मधील सर्वात जास्त नफा मिळवणा-या चित्रपटांविषयी सांगणार आहोत.

 

पुढील स्लाइटवर क्लिक करुन जाणुन घ्या या चित्रपटांविषयी...

बातम्या आणखी आहेत...