आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bollywood : Moushumi Chatterjee's Son In Law Dicky Sinha Said He Will File A Defamation Case Against The Actress

मोसमी चटर्जी यांच्यावर मानहानीची केस करणार जावई डिकी सिन्हा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क - अभिनेत्री मौसमी चटर्जी यांचे जावई डिकी सिन्हा त्यांच्यावर मानहानीचा केस करणार आहेत. १३ डिसेंबर रोजी मोसी यांची मुलगी आणि डिकीची पत्नी पायल सिन्हा यांचे निधन झाले होते. त्यावेळी मोसमी यांनी पायलची योग्य देखरेख न केल्यामुळे आणि मेडिकल बिल भरल्यामुळे डिकी आणि त्याच्या कुटुंबावर केस करणार असल्याचे म्हटले होते. आता डिकीने मोसमी यांचे आरोप खोटे सांगत त्यांच्यावर पलटवार केला आहे.
 

जानेवारीमध्ये करणार केस : डिकी

डिकीने वक्तव्यात म्हटले की, मी गप्प होतो, कारण पायल आजारी होती, तिच्यावर सर्व लक्ष होते. मी तिच्या घरच्यांची वाट पाहिली. त्यांना मॅसेज केले, जेणे करून ते अंत्य संस्कारात सहभागी होऊ शकतील. अजूनही काही विधी पूर्ण झाले नाहीत, त्याला काही वेळ लागणार आहे. ४० दिवसानंतर पालच्या अस्थी विसर्जनासाठी त्रिवेणीला जायचे आहे. तिच्या आत्म्याला शांती मिळो, असे मला वाटते. त्यानंतर जानेवारीमध्ये मौसमी चॅटर्जी यांच्या विरुद्ध मानहानीचा खटला दाखल करणार आहे
.