आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुपरहिटपेक्षाही जास्त कमाईमुळे चीनकडे वळले बॉलीवूड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनीषा भल्ला / मुंबई/बीजिंग : भारतीय चित्रपट २.० चीनमध्ये प्रदर्शित झाला. एका भारतीय चित्रपटाचे चीनमध्ये ५७ हजारांपेक्षाही जास्त स्क्रीनवर प्रदर्शित होण्याची गेल्या ६४ वर्षांतील ही पहिली वेळ आहे. यापैकी ४९ हजार थ्रीडी स्क्रीन्स आहेत. गेल्या नोव्हेंबर महिन्यात भारतात आलेला हा चित्रपट चीनमध्ये गेल्या ९ महिन्यापासून लटकलेला हा चित्रपट गेल्या ९ महिन्यापासून प्रदर्शित झालेला नव्हता. गेल्या महिन्यात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीन दौऱ्यात भारतीय चित्रपट चिनच्या प्रेक्षकांसाठी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्याबाबत सांगितले होते. या दौऱ्याच्या एक दिवस आधीच २.० ची तारीख मिळाली होती. परराष्ट्रमंत्र्यांपासून बॉलीवूडपर्यंत सर्वजण भारतीय चित्रपटासाठी चीनकडे पाहाण्याची वेळ का आली. यावर इंडियन फिल्म सोसायटीचे एमडी गिरीश वानखेडे व चायनीज कंपनीसोबत चित्रपट तयार करणारे निर्माता मिलिंद उकेय म्हणाले, बॉलीवूडच्या चित्रपटांना चीनमध्ये यश मिळण्यामागे भारतापेक्षा साडेसहा पट जास्त स्क्रीन्स व भारतासारखीच सामाजिक व्यवस्था हे कारण अाहे. येथे जास्त स्क्रीन्स असल्याने सुमार चालणारे चित्रपटही येथे भारतातील सुपरहीट चित्रपटाच्या उत्पन्नाएवढी कमाई करतात. जगात सर्वात जास्त स्क्रीन्स भारतात आहेत. येथे सरासरी २६ चित्रपट दररोज तयार होतात. येथे २६ चित्रपटाच्या स्क्रीन दररोज तयार होत आहेत. तुलनेत भारतात फक्त दहा हजार स्क्रीन्स आहेत.

२००७ मध्ये चीनमध्ये फक्त ३०३४ स्क्रीन्स होत्या. त्यानंतर २०१८ मध्ये ९३०० स्क्रीन सुरु झाल्या. या स्क्रीन प्रथम श्रेणीच्या ३ ते ५ पर्यंतच्या छोट्या शहरात स्क्रीन्स उपलब्ध आहेत. याच भागात भारतीय चित्रपटांची मागणी वाढते आहे. तेथेही सामाजिक परिस्थिती भारताच्या २ ते ३ श्रेणी शहर व गावाप्रमाणे आहे. पण भारतात चित्रपटगृहांची वाढ थांबली आहे. २००९ मध्ये १५ हजाराच्या तुलनेत आता फक्त दहा हजार स्क्रीन्स उपलब्ध आहेत. बाॅलिवूड चित्रपट देशात सरासरी ३ ते ५ हजार स्क्रीनवरच प्रदर्शित होतो. हे प्रमाण चीनच्या तुलनेत ९० टक्क्याहूनही कमी आहे. सिक्रेट सुपरस्टारसारख्या चित्रपटांनी तर चीनमध्ये भारतापेक्षाही दहापट जास्त कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाची कमाई ४२ कोटी रुपये इतकी होती. बॉलिवूड तेथे जाण्याचे हेच मोठे कारण आहे.

मिलिंद यांनी सांगितले, आधी चित्रपट उद्योगात अंडरवर्ल्डचा पैसा असायचा. त्यानंतर रियल इस्टेट व हिरे कंपन्या आल्या. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. बॉलीवूडचा चिनी कंपनीकडे वाढता कल पाहून नवी बाजारपेठ मिळणार आहे. नव्या संरचनेत नफा, हक्क व वितरण इत्यादीच्या भागीदारीवर सर्वांचे लक्ष असते.

३० हजार स्क्रीनवर सर्वाधिक कमाई केलेला दंगल
फिल्म : स्क्रीन : कमाई :रिलीज
दंगल : 30364 : 1306 : मे17
सिक्रेट सुपरस्टार : 49133 : 757 : जून 18
अंधाधुन : 29827 : 333 : एप्रिल 19
बजरंगी भाईजान : 20315 : 296 : मार्च18
हिंदी मीडियम : 42330 : 219 : एप्रिल
*कमाई कोटी रुपयांत

तेथे अॅक्शन होतेय फेल, आपले चित्रपट हिट
चीनमध्ये आजवर प्रदर्शित झालेल्या १०० बॉलीवूड चित्रपटांत दरवेळी अॅक्शन-रोमान्स अशी थीम असायची. या चित्रपटाला कमी प्रेक्षक मिळाले. चीनमध्ये १०० कोटीपेक्षा जास्त कमाई केलेल्या ९ चित्रपट लक्षात घेतले तर हे सर्व प्रेरणा, सामाजिक समस्या व लैंगिक भेदभावावर तयार झालेले आहेत. दंगल, सिक्रेट सुपरस्टार येथे कमाईत १ -२ क्रमांकावर असणेच याचे उदाहरण आहे.

चीनमध्ये बॉलीवूडची चलती
चीनमध्ये नॉन चायनिज चित्रपटांसाठी कोटा सिस्टिम आहे. १९९४ पासून दहा चित्रपटांचा कोटा होता. आज ३५ चित्रपटांचा आहे. चिनी थिएटरमध्ये यापेक्षा अधिक चित्रपट दाखवता येत नाहीत. सुरुवातीला २०-२५ हॉलीवूड व २ बॉलीवूड चित्रपट चिनमध्ये वार्षिक प्रदर्शित हाेत असत. दंगलच्या सुपर कमाईतून २०१७ मध्ये चिनने कोट्यातून हॉलिवूडचा कोटा घटवून भारतीय चित्रपटांची संख्या वाढवली आहे. आता ६ चित्रपट दाखवतात. भारतीय चित्रपटांचा वाढता व्यवसाय पाहून सरकार बॉलिवूडसाठी उदार झाले आहे. २०१८ मध्ये चीनमध्ये १० बॉलीवूड चित्रपटांना चीनच्या पडद्यावर जागा मिळाली. चायना चित्रपट असोसिएशननुसार, १९५५ मध्ये आवारा' हा पहिला चित्रपट चिनमध्ये आला होता. १९८० ते १९९९ दरम्यान ३० चित्रपट आले. २०१४ मध्ये पुन्हा करार केला गेला.
 

बातम्या आणखी आहेत...