आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने नवीन वर्षात पाच संकल्प केले आहेत. याची घोषणा त्याने टि्वटरवर केली. त्याने आधी आपल्या चाहत्यांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा दिल्या आणि नंतर आपले न्यू इयर रिझोल्युशन शेअर केले. त्याच्या यादीत पहिला संकल्प आहे, आधीसारखी पिळदार शरीरयष्टी बनवणे, दुसरा -2018 मध्ये झालेल्या चुका सुधारत पुढे जाणे, तिसरा- सर्वोत्कृष्ट चित्रपट बनवणे. चौथा- काही तरी नवीन शिकणे पाचवा आणि शेवटचा संकल्प आहे, आई, मुले आणि पत्नीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवणे.
— Aamir Khan (@aamir_khan) December 31, 2018
आमिरने मागितली माफी...
आमिरने यासोबतच माफीदेखील मागितली आहे. त्याने लिहिले, नकळत कुणालाही त्रास झाला असेल तर मी त्याची माफी मागतो. याबरोबरच त्याने सोमवारी आपल्या प्रॉडक्शनच्या 'रूबरू रोशनी' चित्रपटाचीही घाेषणा केली. त्याचा प्रीमियर 26 जानेवारी 2019 रोजी होईल. हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, अशी आशाही त्याने व्यक्त केली. आमिरने सांगितले, मी आणि किरणने मिळून याची निर्मिती केली आहे. हा चित्रपट आमच्या हृदयाच्या खूप जवळ आहे. 'रूबरू रोशनी' पाहायला विसरू नका. स्वाती चक्रवर्तीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.