आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूड डेस्क. साउथ चित्रपटांचे प्रसिध्द कॉमेडियन 62 वर्षांच्या ब्रम्हानंद यांची जवळपास 25 दिवसांपुर्वी जानेवारी 2019 मध्ये हार्ट सर्जरी झाली. मुंबईमध्ये झालेल्या सर्जरीनंतर त्यांचे चाहते त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते. साउथचा सुपर स्टार अर्जुनही ब्रम्हानंद यांना नुकताच भेटायला गेला होता. या भेटीचा फोटो अर्जुनने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
अनेक चित्रपटांमध्ये केले एकत्र काम
1. अलु अर्जुन आणि ब्रम्हानंद यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. ब्रम्हानंद यांना भेटल्यानंतर अलुने लिहिले की, खरा आयरन मॅन, एक मजबूत हृदयाची व्यक्ती, मजेदार आणि निडर, आपल्या किलबिल पांडेला पाहून खुप आनंदी आहे. लव्ह ब्रामी.
गिनीज बुकमध्ये नाव
ब्रम्हानंदचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे. हा रेकॉर्ड 2007 मध्ये एकाच भाषेत 700 पेक्षा जास्त चित्रपटात अभिनय करण्यासाठी नोंदवण्यात आले आहे. त्यांनी तीन दशकांच्या दिर्घ करिअरमध्ये 1000 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले. ब्रम्हानंद एका चित्रपटासाठी जवळपास 1 कोटी रुपये चार्ज करतात.
अनेक कार आणि एग्रीकल्चर फार्मचे मालक
ब्रम्हानंद यांच्याजवळ Audi R8, Audi Q7, मर्सिडीज बेंज आणि इनोव्हासारख्या लग्जरी कार आहेत. यासोबतच त्यांच्याजवळ कोट्यावींची शेती आहे. यासोबतच ब्रम्हानंद यांचे हैदराबादचा पॉश परिसर जुबली हिल्स येथे एक आलीशान बंगला आहे. ब्रम्हानंदम हे खुप प्रसिध्द आहे. ते प्रत्येक दुस-या-तिस-या चित्रपटामध्ये कॉमेडी करताना दिसतात.
View this post on InstagramA post shared by Allu Arjun (@alluarjunonline) on Feb 7, 2019 at 12:30am PST
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.