आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bollywood Shocked By The Death Of Senior BJP Leader Arun Jaitley, Paid Tribute On Social Media

भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांच्या निधनाने शोकाकुल झाले बॉलिवूडकर, सोशल मीडियावर दिली श्रद्धांजली 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे निधन झाले आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, काहीच सुधारणा दिसत नव्हती. शनिवारी त्यांच्या निधनाची बातमी समोर आली. त्यांच्या निधनामुळे राजकीय नेत्यांबरोबरच बॉलिवूडदेखील दुःखी झाले आहे. रितेश देशमुख, अनिल कपूर यांच्यासह अनेक कलाकारांनी अरुण जेटली यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली अर्पण केली. 
 

अनिल कपूर... 
अभिनेते अनिल कपूर म्हणाले, 'सुमारेब 20 वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा अरुण जेटली यांना भेटलो. त्यावेळेपासूनच मी त्यांचा प्रशंसक आहे. देशाचे मोठे नुकसान झाले. आम्हाला सर्वांना त्यांची खूप आठवण येईल. या प्रसंगी त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करतो.'
 

 

रितेश देशमुख... 
रितेश देशमुखने ट्वीट केले, 'अरुण जेटली यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप वाईट वाटले, त्यांच्या कुटुंबियांना सांत्वन.'
 

 

गुल पनाग... 
गुल पनागने लिहिले, 'अरुण जेटली यांच्याबद्दल ऐकून दुखी आहे. त्यांच्या जाण्याने देशाचे खूप नुकसान झाले. यावेळी त्यांच्या कुटुंबियांना हिंमत मिळो.' 
 

 

अदनान सामी... 
गायक अदनान सामीने ट्वीट केले की, 'अरुण जेटली यांच्या निधनाची दुःखद बातमी ऐकली, त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.'