आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई. म्यूझिक डायरेक्टर आणि सिंगर बप्पी लहेरी बॉलिवूडमधील वेगळी ओळख आहे. 27 नोव्हेंबरला बप्पी वयाची 66 वर्षे पुर्ण करतील. त्यांचे खरे नाव आलोकेश लहिरी आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये डिस्को म्यूझिकचा ट्रेंड आणण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. डिस्को म्यूझिकसोबतच खुप जास्त सोने घालणे आणि नेहमी गॉगल्स घालणेही बप्पी यांची ओळख आहे. त्यांच्या जवळ टेस्ला X कार आहे याची किंमत 55 लाख रु. आहे. 2014 च्या निवडणूकीदरम्यान बप्पी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता आणि पश्चिम बंगालच्या श्रीरामपुरमधून त्यांना तिकीट देण्यात आले होते. बप्पी यांनी 2014 मध्ये आपल्याकडील सोने किती आहे ते जाहिर केले होते. त्यांच्याजवळ 754 सोने आहे. तर पत्नी चित्राणीजवळ 967 ग्राम सोन्याचे दागिणे आहेत. म्हणजेच त्यांच्याजवळ 1 किलो 700 ग्राम सोने आहे. आजच्या तारखेला या सोन्याची किंमत 51 लाख आहे. यासोबतच बप्पी यांनी आपल्या घरात हिट गाण्याच्या आठवणीत गोल्ड प्लेटेड डिस्क लावली आहे. आज आम्ही तुम्हाला बप्पी लहेरी यांच्या घराची इनसाइड झलक दाखवणार आहेत.
- बप्पी दाचे आई-वडील बंगाली सिंगर आणि क्लासिक म्यूझिशियन होते. कोलकातामध्ये बप्पी यांचा जन्म झाला. बप्पी लहेरी हे आपल्या आई-वडीलांना एकुलते एक होते. आईच्या नात्यातून सिंगर आणि अॅक्टर किशोर कुमार त्यांचे नातेवाईक होते.
- बप्पी दाच्या आईचे नाव चित्रांशा आहे. बप्पी यांना दोन मुलं आहेत. मुलगी रीमाही सिंगर आहे. तिचे लग्न बिझनेसमन गोविंद बंसलसोबत झाले आहे. तर बप्पी दा यांच्या मुलाचे नाव बप्पा लहिरी आहे, तो म्यूझिक डायरेक्टर आहे आणि त्याचे लग्न तनिषा वर्मासोबत झाले आहेत.
- बप्पी लहेरी अजोबा झाले आहेत. 4 अक्टोबर 2017 मध्ये त्यांचा मुलगा बप्पा लहेरीला मुलगा झाला होता. नातवाच्या नामकरणावेळी बप्पी लहेरी यांना नातवाला सोन्याच्या ताटात खीर खाऊ घातली होती आणि डायमंड पेंडिल गिफ्ट केले होते.
3 वर्षांच्या वयात सुरु झाली ट्रेनिंग
- बप्पी यांचे कुटूंब संगीताशी संबंधीत होते. यामुळे त्यांची ट्रेनिंग वयाच्या तिस-या वर्षीच सुरु झाली. तिस-या वर्षापासून बप्पी यांनी तबला वाजवणे सुरु केले. वयाच्या 19 वर्षी मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांना बंगाली फिल्म (दादू,1972) मधून पहिला ब्रेक मिळाला. तर 1973 मध्ये आलेला 'शिकारी' हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता. यासाठी त्यांनी म्यूझिक कंपोज केले होते.
- 1980 आणि 90 च्या दशकात बप्पी दा यांनी जबरदस्त साउंड ट्रॅक्स बनवले यामध्ये वारदात, डिस्को डान्सर, नमक हलाल, डान्स डान्स, कमांडो, गँग लीडर, शराबी सारखे चित्रपट केले. ते पहिले असे म्यूझिक डायरेक्टर होते ज्यांना 1982 मध्ये आलेल्या 'डिस्को डान्सर'साठी बीचिंगमध्ये 'चायना अवॉर्ड' मिळाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.