आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या शाळेच शिकतात बॉलिवूडचे अनेक स्टार किड्स, अॅडमिशनसाठी द्यावी लागले एवढी फीस की त्यात खरेदी करता येतील 4 कार, येथे आहेत सर्व अत्याधुनिक सुविधा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः बॉलिवूडमधील जवळजवळ सर्वच कलाकारांची मुले धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत आहेत.15 वर्षांपूर्वी या शाळेची स्थापना  प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी केली होती. 2003 सुरु झालेली ही शाळा मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथील बीकेसी कॉम्पलेक्समध्ये  असून शाळेची सात मजली इमारत आहे. आहे. बॉलिवूडच्या स्टार्सची त्यांच्या मुलांसाठी या शाळेला पहिली पसंती असते. एलकेजीपासून ते दहावीपर्यंत ही शाळा आहे. या शाळेत प्रवेशासाठी तब्बल 24 लाख रुपये फिस द्यावी लागले. या फीसमध्ये सँट्रो, डिझायर, स्विफ्ट, सेलेरियो, आय 10 सारख्या चार कार खरेदी करता येऊ शकतात.

 

या शाळेत स्कॉलरशिप जिंकणार्‍या विद्यार्थ्यांना स्टेनफोर्ड, प्रिन्सटेन व येल सारख्या इंटरनॅशनल यूनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळते. हाय सिक्युरिटी आणि सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या स्कूलमध्ये अनेक वार्षिक उत्सव साजरे केले जातात. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलला नॅशनल तसेच इंटरनॅशनल कुरिकुलम स्कूल असे संबोधले जाते.

 

अव्वाच्या सवा आहे शाळेची फीस...
या शाळेत ICSE, IGCSE, IBPD बोर्डचे वर्ग आहेत. 
‘एलकेजी’ ‘लोअर किंडर गार्डन’पासून सातवीपर्यंतची फी - 1 लाख 70 हजार रुपये
आठवी ते दहावी (आयसीएसइ बोर्ड) फी – 1 लाख 85 हजार रुपये
आठवी ते दहावी (आयजीसीएइ) फी – 4 लाख 48 हजार रुपये, इतके शुल्क आकारले जाते.


नीता अंबानींच्या या शाळेला आहे सेलिब्रिटींची पसंती... 
नीता अंबानी यांच्या धारुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलला बॉलिवूड कलाकारांची पहिली पसंती आहे. शाहरुखपासून ते ऐश्वर्या, आमिर खान, हृतिक रोशन, चंकी पांडे, श्रीदेवी, करिश्मा कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींची मुले याच शाळेत शिकत आहेत. तर काहींचे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. स्वतः नीता अंबानी या शाळेच्या प्रत्येक अॅक्टिव्हिटीवर नजर ठेवतात. येथे बॉलिवूड सेलिब्रिटी, राजकारणी, उद्योगपतींची मुले शिकतात. त्यामुळे येथे सुरक्षा व्यवस्थादेखील चोख ठेवण्यात आली आहे.


या शाळेची वैशिष्ट्ये... 
या शाळेत कॉम्प्यूटर आणि सायन्स लॅब, डॉक्टर्स -नर्सची टीम, मेडिकल सेंटर या सुविधा उपलब्ध आहेत. शाळेच्या लायब्ररीत सुमारे 38200 पुस्तके आहेत. संपूर्ण कॅम्पसमध्ये वायफायची सोय आहे. आधुनिक किचन आणि दोन डायनिंग हॉलसह कॅफेटेरिया आहे. 

बातम्या आणखी आहेत...