Home | National | Other State | Bollywood star Sunny Deol car got in accident while going to Gurudaspur

बॉलीवूड स्‍टार सनी देओलच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावले सनी, त्यांच्या कारसोबतच इतर तीन गाड्यांचे नुकसान

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 13, 2019, 03:09 PM IST

त्यांच्या गाडीसोबतच इतर तीन गाड्यांचाही अपघात

  • Bollywood star Sunny Deol car got in accident while going to Gurudaspur

    गुरदासपूर(पंजाब)- बॉलीवूड स्‍टार आणि गुरदासपूर येथून भाजपेचे उमेदवार सनी देओल यांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघाता सनी देओल थोडक्यात बचावले आहेत, पण त्यांच्या गाडीचे खूप नुकसान झाले. या अपघातात त्यांच्यासोबत असलेल्या इतर तीन गाड्यांचेही नुकसान झाले आहे. सनी रोड शोसाठी आपल्या मतदारसंघात जात होते.


    अपघात अमृतसर नॅशनल हायवेवर झाला. मिळालेल्या माहितीनुसार सनी आपला निवडणूक प्रचार आणि रोड शोसाठी जात होते. त्यांचा ताफा गुरदासपूर-अमृतसर नॅशनल हायवेवरील सोहल गावाच्या जवळ पोहचला होता त्यावेळी त्यांचा अपघात झाला. रस्त्याने जात असताना चुकीच्या दिशेने एक गाडी आली आणि सनीच्या गाडीता समोरून धडक मारली. या अपघातात सनीच्या गाडीचे पुढील चाक निघाले आणि गाडी डिव्हायडरवर आदळली. यानंतर त्यांच्या ताफ्यात मागून येणाऱ्या तीन गाड्यादेखील एकमेकांवर धडकल्या. या अपघातानंतर काहीवेळ एकच गोंधळ उडाला होता, पण काही वेळानंतर सनी आपल्या नियोजिक कार्यक्रमसाठी निघाले.

  • Bollywood star Sunny Deol car got in accident while going to Gurudaspur
  • Bollywood star Sunny Deol car got in accident while going to Gurudaspur
  • Bollywood star Sunny Deol car got in accident while going to Gurudaspur

Trending