आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअनेक दशकांपासून बाॅलीवूडच्या गादीवर राज्य करणाऱ्या सिनेताऱ्यांचा कंफर्ट झाेनमुळे माेहभंग झाला आहे. सलमान खान, अजय देवगण, शाहरुख खानपासून ते अभिनेत्री दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा, कंगना रनोट, तापसी पन्नू, भूमी पेडणेकर आणि इतर कलाकारदेखील पडद्यावर खरं वय सांगत आहेत आणि वेगळ्या धाटणीच्या भूमिकांना प्राधान्य देत आहेत. उदाहरण म्हणजे सलमान खान भारतमध्ये वयस्कर माणसाची भूमिका साकारणार आहे.
अजय देवगणने आधी 'गोलमाल रिटर्न्स' मध्ये स्वत:चे वय ४९ सांगितले आणि कमी वयाच्या परिणीती चोप्राच्या पात्रावर प्रेम केले. तसेच चित्रपटात स्वत:वर भरपूर विनाेदही केला. आता 'दे दे प्यार दे' मध्येदेखील ताे ५० वर्षांचा झालाे, असे सांगताना दिसणार आहे. दीपिका 'छपाक' मध्ये ग्लॅमर नसलेले आणि प्रभावित करणारे पात्र साकारणार आहे. शाहरुख खानने 'झीरो' मध्ये बुटक्या माणसाची भूमिका केली हाेती. तज्ज्ञांच्या मते खासकरून वयस्कर कलाकार काही प्रमाणात टॉम हँक्स, जॉर्ज क्लुनीसारखे करण्याचा प्रयत्न करत आहेत. खरं वय पडद्यावर साकारून देखील ते स्टार आहेत.
आमिर खानच्या प्रवाहातून वेगळ्या भूमिका
- 'दंगल' मध्ये ढेरी असलेल्या वडिलांची भूमिका केली.
- 'फॉरेस्ट गम्प' च्या रिमेकमध्ये टिपिकल हीरोची भूमिका नाही, नायक मंदबुद्धी आहे.
- 'तारे जमीं पर' आणि 'पीके' मधील भूमिका वेगळ्या हाेत्या.
सलमानने साकारलेल्या आतापर्यंतच्या भूमिका
- 'क्योंकि...' मनाेरुग्णाची भूमिका
- 'सुलतान' वयस्कर पहिलावन
- 'तेरे नाम' मानसिक आजारी
- 'फिर मिलेंगे' मध्ये एचआयव्ही रुग्ण
- 'ट्यूबलाइट' निरागस पात्र
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.