आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bollywood Stars Take #DollyParton Challenge, Priyanka Chopra And Other Shared Photos

बॉलिवूड स्टार्सलादेखील लागले #डॉलीपार्टन चॅलेन्जचे वेड, प्रियांकासह अनेक स्टार्सने शेअर केले फोटोज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवुड डेस्क : सोशल मीडिया यूजर्समध्ये सध्या #DollyPartonChallenge (डॉली पार्टन चॅलेंज) चे जबरदस्त क्रेज आहे आणि आता बॉलिवूड स्टार्सनेदेखील यामध्ये भाग घयायला सुरुवात केली आहे. अनेक स्टार्सने हे चॅलेंज घेतल्यानंतर शनिवाती प्रियांका चोप्रानेदेखील इंस्टाग्रामवर 'डॉली पार्टन' लिकचे आपले फोटो टाकले. साधारणपणे या चॅलेंजमध्ये लिंकडिन, फेसबुक, इंस्टाग्राम आणि टिंडरचे लूक शेअर केले जातात पण, प्रियंकाने यामध्ये टिंडर आणि लिंकडिन ऐवजी 'बम्बल' आणि 'बम्बल बिज' यांना समाविष्ट करून ट्विस्ट आणला. 

आपल्या या पोस्टसोयाबीत कॅप्शनमध्ये प्रियांकाने लिहिले, 'हे सर्व यामुळे करत आहे कारण, डॉली म्हणाली आहे. #dollypartonchallenge'. प्रियांकाव्यतिरिक्त सारा अली खान, करण जोहर, आयुष्मान खुराना आणि दिलजीत दोसांझ यांनीही हे चॅलेंज घेतले आहे. आयुष्मानने चार ऐवजी पाच कॅटेगरी बनवल्या आहेत. पाचवी कॅटेगरी त्याने 'मुव्हीज' ठेवली आणि यामध्ये आपल्या चित्रपटांचे दोन फोटो शेअर केले आहेत. 

अमेरिकन सिंगरच्या नावावर सुरु झाले हे चॅलेंज... 

हे चॅलेंज अमेरिकन सिंगर डॉली पार्टनच्या नावावर सुरु झाले आहे. जिने 22 जानेवारीला आपले चार वेगवेगळे फोटोज कोलाज बनवून वेगवेगळ्या सोशल मीडिया अप्लिकेशनची नावे देऊन इंस्टाग्रामवर शेअर केले होते. लवकरच लोकांनी तिची ही स्टाईल कॉपी करायला सुरुवात केली आणि हा ट्रेंड व्हायरल झाला. यामुळे याचे नावही तिच्या नावावर #DollyPartonChallenge पडले. 74 वर्षांच्या या सिंगारने आपल्या पोस्टसोबत लिहिले होते, 'तुम्हाला एखादी अशी महिला मिळावी, जी हे सर्व करू शकेल.'

बातम्या आणखी आहेत...