आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईमध्ये प्रियांका-निकची एंगेज्मेंट पार्टी, पण सलमान-शाहरुख राहणार गैरहजर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांची एंगेज्मेंट पार्टी 18 ऑगस्ट रोजी मुंबईत होणार आहे. यासाठी निक गुरुवारीच त्याची आई डेनिस आणि वडील केविनसोबत मुंबईत दाखल झाला आहे. पार्टीसाठी प्रियांकाचे नातेवाईक आणि जवळच्या मित्रांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. आज (18 ऑगस्ट) प्रियांकाची रोका सेरेमनी असून तिची चुलत बहीण परिणीती चोप्रा लखनऊहून मुंबईत दाखल झाली आहे. सकाळपासून प्रियांकाच्या घरी पाहुण्यांचे येणेजाणे सुरु झाले आहे. पण या पार्टीत सहभागी होणा-या पाहुण्यांची ऑफिशिअल लिस्ट अद्याप समोर आलेली नाही. पण काही नावांची शक्यता वर्तवली जात आहे, जे या पार्टीत सहभागी होणार नाहीत. एक नजर टाकुया या सेलेब्सवर... 

 

सलमान खान

सलमान खान सध्या त्याच्या आगामी 'भारत' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी माल्टा येथे आहे. यामुळे तो प्रियांकाच्या पार्टीत सहभागी होऊ शकणार नाही. प्रियांकाने सुरुवातीला हा चित्रपट साइन केला होता. पण ऐनवेळी तिने यातून काढता पाय घेतला. यामुळे सलमान तिच्यावर सध्या नाराज आहे.

 

शाहरुख खान
- शाहरुख खान प्रियांकाच्या जवळच्या मित्रांपैकी एक आहे. पण तोदेखील या पार्टीत सहभागी होऊ शकणार नाही. कारण तो सध्या त्याच्या आगामी 'जीरो' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे, तर त्याचे कुटुंबीय सध्या कॅलिफोर्नियात आहे. त्यामुळे खान कुटुंबातून कुणीही या पार्टीत सहभागी होणार नाही.

 

रणबीर कपूर

- रणबीर कपूर सध्या बुल्गारियामध्ये त्याच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. त्यामुळे त्याचे पार्टीत सहभागी होणे अशक्य आहे. दोघांनी 'अनजाना-अनजानी' या चित्रपटात एकत्र काम केले होते. 

 

अनुष्का शर्मा

- अनुष्का प्रियांकाची जवळची मैत्रीण आहे. पण तीसुद्धा या पार्टीत सहभागी होऊ शकणार नाहीये. कारण सध्या ती लंडनमध्ये आहे. 

 

अलीकडेच चर्चेत आली प्रियांकाची एंगेज्मेंट रिंग...

- अलीकडेच प्रियांका चोप्रा फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या पार्टीत सहभागी झाली होती. यावेळी तिच्या हातात असलेल्या डायमंड रिंगची जास्त चर्चा झाली. ही अंगठी प्रियांकाच्या साखरपुड्याची असून त्याची किंमत तब्बल एक कोटी 40 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...