Home | Flashback | Bollywood Stars Who Started Career As Background Dancers

शाहरुख-ऐश्वर्यामागे एक्सट्रा डान्सर्स होते हे सुपरस्टार्स! या गाण्यात हृतिकच्या मागे नाचला सुशांत; काजल, दिया मिर्झाही होते Background Dancers

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 01, 2018, 11:33 AM IST

आम्ही आपल्याला अशाच एकूण 9 सेलिब्रिटींबद्दल सांगणार आहोत.

 • Bollywood Stars Who Started Career As Background Dancers

  मुंबई - करिश्मा कपूरने नुकतेच एका रियालिटी शोमध्ये गेस्ट म्हणून हजेरी लावली होती. शोमध्ये तिने जज रेमो डीसूझाला सरप्राइझ ट्रिब्यूट दिला. यात बॅकग्राउंड डान्सर ते सुप्रसिद्ध कोरिओग्राफर आणि फिल्ममेकर बनलेल्या रेमोचा प्रवास दाखवण्यात आला. क्लिपमध्ये रेमो प्रसिद्ध कलावंतांच्या मागे डान्स करताना दिसून आला. करिश्मा कपूरचा चित्रपट रक्षकमध्ये आपण बॅकग्राउंड डान्सर होतो असे त्याने सांगितले तेव्हा करिश्मा हैराण झाली. करिश्माला याची माहिती नव्हती. बॉलिवूडमध्ये आज प्रसिद्ध असले तरीही असे अनेक कलाकार आणि सुपरस्टार आहेत ज्यांनी बॅकग्राउंड डान्सर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. आम्ही आपल्याला अशाच एकूण 9 सेलिब्रिटींबद्दल सांगणार आहोत.


  1. शाहिद कपूर
  लहानपणी शाहिद कपूरने कॉम्प्लॉनच्या टीव्ही अॅडमध्ये काम केले होते. यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात एक बॅकग्राउंड डान्सरच्या स्वरुपात केली. 1999 मध्ये ताल चित्रपटात ऐश्वर्या रायच्या एका गाण्यात बॅकग्राउंडमध्ये तो नाचला होता. त्याही पूर्वी 1997 मध्ये दिल तो पागल है या चित्रपटात त्याने मागे डान्स केले होते. 2003 मध्ये त्याने 'इश्क विश्क' चित्रपटात लीड अॅक्टर म्हणून बॉलिवूड डेब्यू केला. त्याला या चित्रपटासाठी बेस्ट डेब्यु अॅक्टरचा फिल्मफेअर मिळाला होता.

  पुढील स्लाइड्सवर पाहा, सुशांत सिंह, फराह खान आणि सरोज खान यांच्यासह इतर प्रसिद्ध नावे

 • Bollywood Stars Who Started Career As Background Dancers

  2. सुशांत सिंह राजपूत
  सुशांत सिंह राजपूतने 2013 मध्ये 'काई पो चे' लीड अॅक्टर म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तत्पूर्वी सुशांतने 2006 मध्ये 'धूम-2' चित्रपटात टायटल साँगमध्ये हृतिक रोशनच्या मागे एक्सट्रा डान्सर्समध्ये डान्स केला होता. 

 • Bollywood Stars Who Started Career As Background Dancers

  3. डेझी शाह
  अॅक्ट्रेस बनण्यापूर्वी डेझी शाह बॅकग्राउंड डान्सर होती. तिने 2003 मध्ये तेरे नाम चित्रपटात सलमान खानवर चित्रित लगन लगी गाण्यात डान्स केले होते. ती कॉरिओग्राफर गणेश आचार्याची सहाय्यक म्हणून कार्यरत होती. 2005 मध्ये 'मैने प्यार क्यू किया' चित्रपटाच्या सेटवर सर्वप्रथम सलमान आणि डेझीची भेट झाली होती. सलमानने तिला 'बॉडिगार्ड' चित्रपटात करीना कपूरच्या मैत्रिणीचा रोल ऑफर केला होता. परंतु, तिने तो प्रस्ताव नकारला. यानंतर 'जय हो' चित्रपटात ती सलमानसोबत दिसून आली. 

   

 • Bollywood Stars Who Started Career As Background Dancers

  4. दिया मिर्झा 
  मिस एशिया पॅसिफिक राहिलेली दिया मिर्झा 1999 मध्ये साउथचा चित्रपट 'एन स्वासा कात्रे' च्या एका गाण्यात दिसून आली होती. ती बॅकग्राउंडमध्ये डान्स करत होती. दियाने 2001 मध्ये 'रहना है तेरे दिल में' या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. 

 • Bollywood Stars Who Started Career As Background Dancers

  5. काजल अग्रवाल
  अजय देवगण 'सिंघम' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी काजल अग्रवाल सुद्धा एक बॅकग्राउंड डान्स होती. साउथमध्ये चित्रपट मिळण्यापूर्वी तिने ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉय यांच्या 'क्यों हो गया ना' (2004) चित्रपटाच्या एका गाण्यात डान्स केला होता. 

 • Bollywood Stars Who Started Career As Background Dancers

  6. फराह खान
  1986 मध्ये 'सदा सुहागन' चित्रपटात लोकप्रीय कॉरिओग्राफर फराह खानने बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केले होते. गोविंदावर चित्रीत करण्यात आलेल्या 'हम हैं नौजवां' गाण्यावर ती थिरकली होती.

 • Bollywood Stars Who Started Career As Background Dancers

  7. अरशद वारसी
  1989 मध्ये जितेंद्र आणि किमी काटर स्टारर 'आग से खेलेंगे' चित्रपटातील 'हेल्प मी' गाण्यात अर्शद वारसीने बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केले होते. 

   

 • Bollywood Stars Who Started Career As Background Dancers

  8. साजिद खान
  जितेंद्र आणि किमी काटर स्टारर 'आग से खेलेंगे' चित्रपटातील 'हेल्प मी' गाण्यात अर्शद वारसीसोबत साजिद खान सुद्धा नाचत होता. ही गोष्ट साजिदनेच शेअर केली होती. 

 • Bollywood Stars Who Started Career As Background Dancers

  9. सरोज खान
  बॉलिवूडमध्ये मास्टरजी नावाने प्रसिद्ध असलेल्या सरोज खान यांनीही आपल्या करिअरची सुरुवात बॅकग्राउंड डान्सर म्हणून केली. 1958 मध्ये 'हावडा ब्रिज' चित्रपटातील 'आइए मेहरबां, बैठिए जानेजां' या गाण्यात सरोज खानने एक्सट्रा डान्सर्स म्हणून काम केले. हे गाणे अशोक कुमार आणि मधुबाला यांच्यावर चित्रीत करण्यात आले होते.

Trending