आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bollywood Superstar Rajinikanth, Kangana Ranaut And Many Bollywood Celebrities Will Attend Oath taking Ceremony Of Prime Minister Modi

पंतप्रधान मोदींच्या शपथविधीसाठी बॉलिवूड सुपरस्टार रजनीकांत, कंगना रनोट यांच्यासह येणार अनेक बॉलिवूड सेलेब्रिटी 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या भव्य विजयानंतर नरेंद्र मोदी गुरुवारी 7 वाजता पंतप्रधान पदाच्या दुसऱ्या पर्वासाठी शपथ घेणार आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मान्यवरांच्या उपस्थिती हा भव्य समारंभ राष्ट्रपती भवन येथे हक शपथविधी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभात 8,000 पाहुण्यांचा समावेश असेल. पाहुण्यांच्या यादीत विदेशी परराष्ट्र, प्रमुख भारतीय राजकारणी, चित्रपट तारे आणि आणि इतरही मान्यवर असणार आहेत. तसेच पश्चिम बंगालमधील मतदान हिंसाचारात ज्या 50 भाजपा कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला झाला होता त्यांच्या कुटुंबियांनाही या शपथविधीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. 

 

पंतप्रधान मोदी यांच्या शपथविधी समारंभासाठी चित्रपट क्षेत्रातील कलाकारांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हसन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभात उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. तसेच कंगना रनोट, शाहरुख खान, संजय लीला भन्साळी आणि करण जोहर यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकारांनाही आमंत्रित केले गेले आहे. 

 

या शपथविधीसाठी व्यवसाय क्षेत्रातील मुकेश अंबानी, गौतम अदानी आणि रतन टाटा यांसारख्या उद्योगकर्त्यांनाही आमंत्रण देण्यात आले आहे. अंबानी, अदानी आणि टाटा, अजय पिरामल, जॉन चेम्बर्स आणि बिल गेट्स यांनाही मोदींच्या शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांमध्ये माजी धावपटू पी. टी. उषा, क्रिकेटपटू राहुल द्रविड, अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, हरभजनसिंग, बॅडमिंटन संघातील सायना नेहवाल, बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद आणि जिम्नास्ट दीपा करमर यांचा समावेश आहे.