Home | News | bollywood woman directors film income

महिला दिग्दर्शकांच्या चित्रपटांची कमाई 100 कोटी, त्यांची स्वत:ची निर्मिती संस्था

ओंकार कुलकर्णी | Update - Mar 10, 2019, 11:58 AM IST

महिला दिग्दर्शक तयार करत आहेत अव्वल ताऱ्यांचे चित्रपट

 • bollywood woman directors film income

  मुंबई - बॉलीवूडमध्ये जेव्हा १०० कोटींच्या कमाईचा मुद्दा येतो तेव्हा बहुतांश पुरुष दिग्दर्शकांची नावे समोर येतात. त्यात राजकुमार हिराणी, रोहित शेट्टी, संजय लीला भन्साळी, कबीर खान हे प्रमुख आहेत. पण बॉलीवूडमध्ये हा ट्रेंड बदलत आहे. आता महिला दिग्दर्शकांचे चित्रपटही मोठा व्यवसाय करत आहेत. झोया अख्तर, मेघना गुलजार या महिला दिग्दर्शकांनी तयार केलेले चित्रपट यशस्वी होत आहेत. याआधी महिला दिग्दर्शकांत फराह खान यांचे चित्रपट चांगलेच हिट होत असत.


  त्यांच्या ‘हॅपी न्यू इयर’ने २९५ कोटी रुपये कमावले होते. ‘गली बॉय’ चित्रपटाच्या लेखिका रीमा कागती यांनी सांगितले की, आमच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा जो प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे आम्ही खुश आहोत. असे म्हटले जाते की, इंडस्ट्रीत महिलांना कमी पाठिंबा मिळतो, पण ही समस्या हॉलीवूडमध्येही आहे. त्याचे कारण म्हणजे महिला उशिरा काम सुरू करतात तोपर्यंत पुरुषांचे वर्चस्व तयार झालेले असते. ट्रेड विश्लेषक अमोद मेहरा यांनी सांगितले की, आता काळ बदलत आहे. आता इंडस्ट्रीत अभिनेत्री किंवा महिला दिग्दर्शकांना पाठिंब्याची गरज नाही. आज त्या निर्मात्यांवरही अवलंबून नाहीत. अनुष्का शर्मा आणि प्रियंका चोप्रा यांसारख्या अभिनेत्रींचे स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस आहे. दीपिका पदुकोणही आपले प्रॉडक्शन हाऊस सुरू करत आहे. तिच्या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करेल.


  महिला दिग्दर्शक तयार करत आहेत अव्वल ताऱ्यांचे चित्रपट : ट्रेड विश्लेषक अमोद मेहरा यांनी सांगितले की, आज सर्व मोठे तारे-तारका अव्वल महिला दिग्दर्शकांसोबत काम करत आहेत. झोया अख्तरने ‘गली बॉय’ आणि ‘दिल धडकने दो’ या दोन चित्रपटांत दोन वेळा रणवीरसिंहसोबत काम केले आहे. हृतिक रोशनने तिच्यासोबत ‘लक बाय चान्स’ आणि ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’त काम केले आहे. फराह खानने आपल्या चित्रपटांत शाहरुख खान आणि अक्षयकुमार यांसारख्या मोठ्या ताऱ्यांसोबत काम केले आहे. ते म्हणतात की, आधी मोठ्या ताऱ्यांच्या मुलांचे लाँचिंग पुरुष दिग्दर्शक करत होते, आता महिला दिग्दर्शकही लाँचिंग करत आहेत. अभिनेता डॅनी यांचा मुलगा रिनजिंगची लाँचिंग ‘स्क्वॉड’ चित्रपटातून होत आहेत. लघुचित्रपट तयार करणाऱ्या ज्योती कपूर दास त्याचे दिग्दर्शन करत आहेत. गौरी शिंदेनेही शाहरुख खान आणि श्रीदेवी यांच्यासोबत काम केलेले आहे.


  मेघना गुलजार | राजीने कमावले १९५ कोटी रुपये
  गेल्या वर्षी आलेल्या ‘राजी’ चित्रपटाचे दिग्दर्शन गुलजार यांची मुलगी मेघना गुलजारने केले होते. आलिया भट्ट अभिनीत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १९५ कोटी रुपये कमावले होते. तिने याआधी फिलहाल, तलवार यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. पण त्यांनी जास्त कमाई केली नाही.


  गौरी शिंदे | अव्वल ५ दिग्दर्शकांत समावेश
  गौरी शिंदेने गेल्या वर्षी डिअर जिंदगी चित्रपट बनवला. सुमारे २० कोटींच्या या चित्रपटाने १३९ कोटी रु. कमावले होते. त्याआधी तिने दिग्दर्शित केलेल्या ‘इंग्लिश विंग्लिश’चित्रपटाची चांगली प्रशंसा झाली होती. या वर्षी ती रेडिफच्या ‘बॉलीवूड्स ५ बेस्ट डायरेक्टर्स ऑफ २०१२’ च्या यादीतही होती.


  झोया अख्तर |दोन आठवड्यांत गली बॉयने कमावले १०० कोटी रु.
  झोया अख्तरच्या दिग्दर्शनात झालेल्या ‘गली बॉय’ने १४ दिवसांत बॉक्स ऑफिसवर १२० कोटी रु. कमावले. तिने २०१५ मध्ये ‘दिल धडकने दो’चेही दिग्दर्शन केले होते. त्यानेही १४५ कोटी कमावले होते.


  कंगना रनौत| मणिकर्णिकाही १०० कोटी रुपयांच्या क्लबमध्ये
  ३ वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावणाऱ्या कंगना रनौतने अलीकडेच प्रदर्शित ‘मणिकर्णिका’चे दिग्दर्शन केले आहे. तिचा हा चित्रपटही १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.

Trending