आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करण जोहरच्या ड्रग पार्टीपासून ते अक्षयच्या सीएएशी संबंधित ट्वीट लाइकपर्यंत, बॉलिवूडच्या नावावर आहेत हे 10 मोठे वाद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः 2019 मध्ये बॉलिवूडमध्ये बरेच मोठे वाद बघायला मिळाले. करण जोहरची ड्रग पार्टी असो, कंगना रनोटची पत्रकारांसोबतची बाचाबाची असो असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा 'केबीसी' मध्ये  झालेला अपमान असो किंवा अक्षय कुमारचा सीएए प्रोटेस्ट ट्वीट अनावधानाने लाइक करणे असो... यावर्षी बॉलिवूडमध्ये 10 मोठे वाद गाजले.

  • यावर्षी बॉलिवूडच्या नावी राहिले हे 10 मोठे वाद

1. करण जोहरचा शो आणि क्रिकेटर्सवर गदारोळ वर्षाच्या सुरूवातीला 'कॉफी विथ करण' मध्ये आलेल्या क्रिकेटपटू हार्दिक पांड्याच्या वक्तव्यामुळे हा शो वादाच्या भोव-यात सापडला होता. के एल. राहुलसोबत तो या शोमध्ये सहभागी झाला होता. महिलांशी असलेल्या संबंधाबद्दल त्याला विचारले असता राहुलने शहाणपणाने उत्तर दिले. पण हार्दिकने दावा केला की, त्याचे एकापेक्षा जास्त स्त्रियांशी संबंध आहेत आणि तो आपल्या पालकांशी उघडपणे बोलू शकतो. यावरुन त्याच्यावर मोठी टीका झाली. हे प्रकरण वाढल्यावर बीसीसीआयने नोटीस बजावत त्याच्यावर बंदी घातली. नंतर हार्दिक आणि राहुल यांनी निवेदन पाठवून त्यांच्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. 2. रोशन कुटुंबात भांडण एका मुस्लिम मुलाशी असलेल्या नात्यामुळे वडिलांनी आपल्याला थप्पड मारली, असे वक्तव्य करुन हृतिक रोशनची बहीण सुनैनाने जूनमध्ये खळबळ उडवून दिली होती.  एका मुलाखतीत तिने हा खुलासा केला होता. आपण वडिलांचे घर सोडले आहे आणि एका वेगळ्या अपार्टमेंटमध्ये राहायला गेले आहे, परंतु आर्थिक अडचणीमुळे परत जावे लागले, असा दावाही सुनैनाने केला होता. या वादाच्या आगीत कंगना रनोट आणि तिची बहीण रंगोली यांनी तूप ओतण्याचे काम केले. कंगनाने एका मुलाखतीत सुनैनाचा उल्लेख  मैत्रीण म्हणून करत रोशन कुटुंबाला लक्ष्य केले होते. रंगोलीने असा दावा केला होता की, सुनैनाला तिच्या भावासाठी कंगनाची माफी मागायची होती. ही बाब  बरेच दिवस चर्चेत राहिले होते. सुनैना वगळता रोशन कुटुंबातील सर्व सदस्य संपूर्ण प्रकरणावर गप्प राहिले होते. 3. विवेक ओबेरॉयचा मीम विवाद मे महिन्यात, विवेक ओबेरॉयने लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर एक मीम शेअर केला होता, त्यात ऐश्वर्या रायला तीन वेगवेगळ्या लोकांसह दाखवले होते. पहिला सलमान खान होता, ज्याला ओपिनियन पोल हे नाव दिले होते. दुसरे म्हणजे स्वत: विवेक ओबेरॉय, ज्याला एक्झिट पोल असे नाव देण्यात आले होते आणि तिसरे अभिषेक बच्चन होते, ज्याला निकालाचे लेबल देण्यात आले होते. यासाठी विवेकला जोरदार ट्रोल केले गेले. ही बाब महिला आयोगापर्यंत पोहोचली होती, त्यानंतर विवेकने माफी मागितली होती. 4. कानमध्ये हिना आणि संपादकाचे आक्षेपार्ह विधान कान चित्रपट महोत्सव मे मध्ये पार पडला. टीव्ही अभिनेत्री हिना खान पहिल्यांदा या महोत्सवाच्या रेड कार्पेटवर दिसली. हिनाच्या हजेरीवरुन एका मासिकाच्या संपादकाने तिच्याबद्दल आक्षेपार्ह भाष्य केले होते.  हिनाच्या रेड कार्पेटवरील फोटो शेअर करताना एडिटरने लिहिले की, “कान अचानक चांदीवली स्टुडिओ बनतो?” यासाठी संपादक ट्रोल झाले होते. हिना वादावर म्हणाली की, ती कठोर परिश्रम करते आणि नेहमीच करत राहील. तिने स्वत: ला चांदिवलीची प्राऊड आर्टिस्ट म्हटले होते.   5. जायरा वसीमने इस्लामसाठी बॉलिवूड सोडले  'दंगल' आणि 'सीक्रेट सुपरस्टार' मध्ये काम केलेल्या जायरा वसीमने जूनमध्ये ती चित्रपटसृष्टी सोडत असल्याची घोषणा करून सर्वांना चकित केले होते. तिने इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट प्रसिद्ध केली होती. त्यात तिने लिहिले होते की, ती चित्रपटांमध्ये काम करुन आनंदित नाहीत, कारण यामुळे तिच्या धार्मिक श्रद्धेमध्ये हस्तक्षेप होत आहे. " एखाद्याने झायराचे सोशल मीडिया अकाउंट हॅक केले असावे असा प्राथमिक अंदाज वर्तवला गेला होता. पण नंतर स्पष्ट झाले की, तिने खरंच चित्रपटसृष्टी सोडली आहे. 6. करण जोहरची ड्रग्स पार्टी जुलैच्या उत्तरार्धात आणि ऑगस्टच्या सुरूवातीस शिरोमणी अकाली दलाचे आमदार मनजिंदरसिंग सिरसा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ आणि फोटो पोस्ट केला ज्यामध्ये दीपिका पदुकोण, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, शाहिद कपूर, वरुण धवन, विक्की कौशल, अयान मुखर्जी, नताशा दलाल, रणबीर कपूर आणि मीरा कपूर यांच्यासह काही अन्य सेलेब्स करण जोहरसोबत पार्टी करताना दिसले होते. या सर्व सेलेब्सने करण जोहरसोबत ड्रग पार्टी करत असल्याचा आरोप सिरसा यांनी केला होता. त्यांनी पोलिस आयुक्तांना पत्र लिहून सर्व सेलिब्रिटींविरूद्ध एफआयआर नोंदवण्याचे आवाहन केले होते. मात्र करण आणि बाकीचे सेलेब्स यांनी स्पष्टीकरण देताना हा आरोप नाकारला.  सेलिब्रिटींनी स्पष्टीकरण देताना म्हटले होते की, हे फोटो आणि व्हिडिओ काढण्यापूर्वीच्या काही मिनिटे आधीपर्यंत करणची आई हीरूसुद्धा  हजर होत्या. त्यांच्यावर असलेले ड्रग पार्टीचे आरोप बिनबुडाचे आहेत. 7. पत्रकाराबरोबर कंगनाचा वाद 'जजमेंटल है क्या' या चित्रपटाच्या गाण्याच्या लाँचिंगच्या वेळी पत्रकार जस्टिन राव यांच्यावर भडकल्याने कंगना रनोट वादात सापडली होती. सुमारे साडेसहा मिनिचे तिचे पत्रकाराशी भांडण झाले होते.  तिच्या या वागण्यावर कडक टीका झाली होती. माध्यमांनी तिच्याकडे पत्रकाराची माफी मागण्याची मागणी केली होती. पण याला तिने नकार दिला होता. जस्टिन तिच्याविरोधात चुकीच्या गोष्टी लिहित असल्याचा आरोप कंगनाने केला होता आणि 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' चित्रपटाच्या रिलीजच्या वेळीही पत्रकाराने चित्रपटाबद्दल चांगले लिहिले नव्हते, असा आरोप कंगनाने केला होता. 8. यशराज फिल्म्सवर रॉयल्टी न भरल्याचा आरोप आहे इंडियन परफॉर्मिंग आर्ट्स सोसायटी (आयपीआरएस) या संगीतकार, गायक आणि गीतकारांच्या हक्कांसाठी काम करणार्‍या संस्थेने नोव्हेंबरमध्ये वायआरएफ (यशराज फिल्म्स) यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला. प्रॉडक्शन हाऊसवर आरोप होता की, त्यांनी आयपीआरएसच्या सदस्यांची 100 कोटींपेक्षा जास्त म्युझिक रॉयल्टी एकत्र केली.  पण ती त्यांना देण्यात आली नाही. कथितरित्या वायआरएफवर दबाव आणून आयपीआरएसच्या सदस्यांना रॉयल्टी गोळा करण्यास प्रतिबंध केला होता. 9. 'केबीसी 11' ने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला नोव्हेंबरमध्ये अमिताभ बच्चन यांचा 'कौन बनेगा करोडपती 11' हा कार्यक्रम एका प्रश्नात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानामुळे वादात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्ण नावाऐवजी प्रश्नाचे पर्याय फक्त 'शिवाजी' वापरण्यात आले होते. इतर पर्यायांमधे, राजांच्या नावासमोर त्यांचे संबोधन लिहिले होते.   प्रश्न असा होता- या पैकी कोणते शासक मुगल सम्राट औरंगजेबचे समकालीन होते? पर्यायांमध्ये महाराणा प्रताप, राणा सांगा, महाराजा रणजित सिंह आणि 'शिवाजी' यांचा समावेश होता. यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि ट्विटरवर # बायकोट केबीसी सोनी टीव्हीचा ट्रेंड करू लागला होता. शोचे निर्माता सिद्धार्थ बसू आणि होस्ट अमिताभ बच्चन यांनी नंतर ट्विटरद्वारे माफी मागितली. शोच्या एका भागामध्ये स्क्रोलद्वारेही दिलगिरी व्यक्त केली गेली. 10.  सीएएचा निषेध ट्विट  लाइक करुन वादात अडकला होता अक्षय  नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) डिसेंबरमध्ये अस्तित्वात आला. देशातील अनेक शहरांमध्ये याविरोधात निषेध नोंदविण्यात आला. यावेळी अक्षय कुमारकडून एक ट्वीट अनवधानाने लाइक केले गेले, ज्यात दिल्लीतील जामिया मिलिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची पोलिस कारवाईची खिल्ली उडवली गेली होती. ट्वीट लाइक केल्याने जेव्हा ट्विटर यूजर्सनी अक्षयला  खडे बोल सुनावले तेव्हा त्याने त्याचे स्पष्ट स्पष्टीकरण दिले होते. अक्षयने त्याच्या एका ट्वीटमध्ये लिहिले की, "जामिया विद्यार्थ्यांचे ट्वीट चुकून लाइक झाले. जेव्हा मला हे समजले तेव्हा मी लगेचच ते अनलाइक केले. कारण मी अशा कोणत्याही कृत्याचे समर्थन करत नाही."

बातम्या आणखी आहेत...