आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bollywood's Disappointment, Producers Say, 64 Thousand Theatres In China, India Don't Even Have 12 Thousand

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलीवूडला मिळाली निराशा, प्रोड्यूसर्स म्हणाले, चीनमध्ये 64 हजार चित्रपटगृह आपल्याकडे 12 हजारदेखील नाही

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : ज्याप्रकारे नियमितपणे पीएम मोदी बॉलिवूड सेलिब्रिटींना भेटत होते. त्यामुळे बॉलीवूडला खूप अपेक्षा होत्या की, या बजेटमध्ये चित्रपट उद्योगातील प्रलंबित मागण्या पूर्ण होतील. पण तशा घोषणा झाल्या नाहीत. तरीदेखील सरकारच्या नाराजीच्या भीतीने काही जण सोडून इंडस्ट्रीतील जास्तीत जास्त प्रोड्यूसर्स-फायनान्सर्स बजेटबद्दल आपली कोणतीही प्रतिक्रिया देताना दिसले नाही.  

  • प्रोड्यूसर्सची सर्वात मोठी संस्था इम्पाचे चेअरमन टीपी अग्रवाल आणि प्रोड्यूसर मुकेश भट्टने नक्कीच मुक्तपणे निराशा वयात केली. टीपी अग्रवाल म्हणाले, बजेटमध्ये बॉलिवूडला काहीच दिले गेले नाही. आम्ही सतत सरकारला थिएटरची संख्या वाढवण्यासाठी गरजेच्या साधनांची मागणी करतो, पण काहीही झाले नाही. चायनामध्ये चित्रपटगृहांची संख्या 64 हजार पर्यंत झाली आहे पण इंडियामध्ये सर्व मिळून 12 हजारदेखील नाहीयेत.
  • सिंगल थिएटरची अवस्था सुधारण्यासाठी आम्ही तिथे टॅक्स बेनिफीटची मागणी करत होतो. त्यांना मल्टीप्लेक्सेसमध्ये कन्व्हर्ट करण्याची मागणी करत राहिलो. त्यावरही बजेटमध्ये काहीही बोलले गेले नाही. मुकेश भट्टने निराशा व्यक्त केली की, यावेळी काहीही एक्सायटिंग अनाऊन्स झाले नाही.
  • मोदी सरकार आणि बॉलिवूडकरांमध्ये बातचीत आणि भेटीचे सेतु बनलेले महावीर जैन म्हणाले, ‘पायरसी रोखन्यासाठी आणि इतर टेक्निकल मुद्दे तर बजेटपूर्वीच अड्रेस झाले होते. हा मोठा दिलासा तर आहे. जो आर्थिक सुधारणेचे पाऊल उचलेल, त्यामुळे मध्यवर्गीय कुटुंबांची क्षमता वाढेल. मग ते मनोरंजनावर स्वाभाविकच खर्च करतील. ग्रामीण आणि रीजनल मार्केट्सला हे बजेट बूस्ट करेल, तर तिथे आर्थिक समृद्धी आल्याने चित्रपट उद्योगाला आपोआपच फायदा होईल.’
  • काही मोठे बॉलिवूड दिग्गज नाव न घेण्याच्या अटीवर म्हणाले, बजेटमध्ये मिळाले काही नाहीये, त्यामुळे आनंद व्यक्त करू शकत नाही आणि दुःखही व्यक्त करू शकत नाही. नाहीतर सरकारचा राग सहन करावा लागेल.

या मागण्या राहिल्या उपेक्षित... 

  • चित्रपटाच्या निर्मितीत कामी येणाऱ्या मशीनरिंवर 15 ते 28 टक्के एक्साइज ड्यूटी हटवण्याची मागणी.
  • तिकिटांवर जीएसटीचे दर 18 ते 12 टक्के करण्याची मागणी.
  • जीएसटीसाठी प्रोड्यूसर, डिस्ट्रीब्यूटर आणि एग्जीबिटर्ससाठी क्लेमची व्यवस्था.