आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलीवूड डेस्क - नुकताच लोकसभा निवडणुकांचा निकाल लागला असून भाजपला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या निकालामुळे सध्या सोशल मीडियावर चर्चांना चांगलेच उधान आले आहे. त्यासोबत सेलिब्रिटीजसुद्धा निवडणुकीविषयी सोशल मीडियावर आपले मत व्यक्त करत आहे. परेश रावलपासून ते रजनीकांत, अजय देवगन, विवेक ओबेरॉय, रवीना टंडन, रितेश देशमुख, धर्मेन्द्र सहित अनेक कलाकारांनी निकालावर ट्वीट केले आहे.
कोण काय म्हणाले?
अजय देवगन
अजयने लिहिले की, देशातील जनतेला माहिती आहे की, त्यांच्यासाठी काय योग्य आहे आणि जनतेने आपली निवड केली आहे.
The country knows what is right for them and they have made their choice.@narendramodi
— Ajay Devgn (@ajaydevgn) 23 May 2019
रजनीकांत
रजनीकांत यांनी लिहले की, आदरणीय आणि प्रिय नरेंद्र मोदी, खूप-खूप शुभेच्छा, तुम्ही करून दाखवले, गॉड ब्लेस
Respected dear @narendramodi ji
— Rajinikanth (@rajinikanth) 23 May 2019
hearty congratulations ... You made it !!! God bless.
परेश रावल
परेश रावल म्हणाले, चौकीदाराला चोर म्हणून कावळे मोर होण्याचा प्रयत्न करत होते. एखाद्या वाटवागूळा प्रमाणे अवस्था झाली आहे. उलटे लटकले..
चौकीदार को चोर बोल के कौआ मोर बन ने चला था , चमगादड़ सी हालत हो गइ , उलटे लटके हुए है . @narendramodi
— Paresh Rawal (@SirPareshRawal) 23 May 2019
रितेश देशमुख
रितेश देशमुखने लिहिले - भारताने निर्णय दिला आहे. लोकशाहीचा उत्सव साजरा करायला पाहिजे, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींना या ऐतिहासिक विजयासाठी शुभेच्छा.
India 🇮🇳 has decided- Democracy needs to be celebrated. Many Congratulations to our Hon Prime Minister @narendramodi ji on this huge verdict.
— Riteish Deshmukh (@Riteishd) 23 May 2019
अनुपम खेर
अनुपम खेर यांनी मोदींच्या विजयाकडे खुणवताना लिहले येणार तर..........
लोकशाहीच्या या उत्सवात आज भारताचे भविष्य आणखी उज्वल होईल. जय हो!
प्रजातंत्र के इस महोत्सव में आज भारत का भविष्य और भी उज्जवल होगा। जय हो।🙏🇮🇳
— Anupam Kher (@AnupamPKher) 23 May 2019
चेतन भगत
भारताने आपला निर्णय दिलेला आहे. मोठा आणि स्पष्ट #Electionsresults2019
India has spoken. Loud and clear. #Electionsresults2019
— Chetan Bhagat (@chetan_bhagat) 23 May 2019
कमाल राशिद खान
कमाल राशिद खानने लिहिले की, पुढील पाच वर्षासाठी स्वतः हे 5 वचन घेत आहे.
1) न्यूज चॅनल बघणार नाही
2) राजकारणावरून ट्वीट करणार नाही.
3) भाजपविरूद्ध एकही शब्द बोलणार नाही.
4) दररोज म्हणणार की, अमित शाह आणि नरेंद्र मोदी राजकारणाचे बाप आहेत.
5) कोणाचेही राजकिय ट्वीट वाचणार नाही किंवा प्रतिक्रिया देणार नाही.
Today I do make 5 promises for next 5 years.
— KRK (@kamaalrkhan) 23 May 2019
1)won’t watch news channels.
2)won’t tweet about politics.
3)won’t say word against BJP
4) Everyday will say that Amit Shah and Narendra Modi are Baap of politics.
5)Won’t read and reply to any political tweet.🙏🌹
एकता कपूर
एकता कपूर म्हणते ः निवडणुकीचे निकाल आले आहेत. भारताने पुढील पाच वर्षासाठी आपले नेतृत्व निवडले आले. जय हिन्द!
The poll results here ..... india has decided its leaders for the next five years ....n most Indians r on diff platforms seeing them emerge ! JAI HIND!
— Ekta Kapoor (@ektaravikapoor) 23 May 2019
धर्मेन्द्र
धर्मेन्द्र यांनी हेमा मालिनींना शुभेच्छा देताना लिहिले की, विजयाबद्दल शुभेच्छा हेमा, आम्हाला मातृभूमिवर प्रेम आहे. हे आपण मथुरा आणि बीकानेरमध्ये सिद्ध केले आहे. आपण सदैव आपल्या तिरंग्याचा सन्मान वाढवू.
Hema , Congratulations. We love Mother India 🇮🇳 we have proved in Bekaner and Mathura. We will keep our 🇮🇳 flying.........always 🙏 pic.twitter.com/utQnUZ5QUj
— Dharmendra Deol (@aapkadharam) 23 May 2019
अभिषेक बच्चन
अभिषेक बच्चननेही नरेंद्र मोदींना शुभेच्छा देत त्यांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया दिली.
— Abhishek Bachchan (@juniorbachchan) 23 May 2019
जूही चावला
जूहीने लिहिले - पीएम मोदींना विजयाच्या शुभेच्छा, हर बार मोदी सरकार!
Wishing our PM a landslide victory ..!!!!!! 🙏😇🌟🌟🌟🌟🌟 HAR BAAR MODI SARKAAR ...!!! @narendramodi
— Juhi Chawla (@iam_juhi) 23 May 2019
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.