आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bollywood's Salute To The Jawans Martyred In Pulwama Attack, Poster Out For The Song 'Tu Desh Mera'

पुलवामाच्या हल्ल्यामध्ये शाहिद झालेल्या जवानांना बॉलिवूडकरांचा सलाम, 'तू देश मेरा' गाण्याचे पोस्टर आउट

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अमिताभ बच्चन, आमिर खान, शाहरुख खान, ऐश्वर्या राय, रणबीर कपूर, कार्तिक आर्यन आणि टायगर श्रॉफने एक देशभक्तीपर गाणे शूट केले आहे. याचवर्षी फेब्रुवारीमध्ये जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये एक आत्मघातकी दहशतवादी हल्ला झाला होता. हे गाणे या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांना समर्पित केले गेले आहे. बुधवारी गाण्याचे पोस्टर रिलीज झाले, ज्यामध्ये सर्व कलाकार जवानांना सलाम करताना दिसत आहेत.  
 

सीआरपीएफने शेअर केले पोस्टर... 
पोस्टर सीआरपीएफ इंडियाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून शेअर केले गेले आहे. यासोबत लिहिले आहे. "हॅप्पी प्रो इंडियाच्या पुलवामाच्या शहिदांची बनवल्या गेलेल्या श्रद्धांजली गीताचे अधिकृत पोस्टर. पुलवामामध्ये शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी एकत्र आले बॉलिवूड. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमिर खान, कार्तिक आर्यन, टायगर श्रॉफ, रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय तुमचे खूप आभार."