Home | International | Other Country | bomb cyclone in denver

डेनेव्हरमध्ये ‘बाॅम्ब सायक्लॉन’ धडकले; 1340 विमान उड्डाणे रद्द

वृत्तसंस्था | Update - Mar 15, 2019, 01:04 PM IST

अडीच लाखांवर लोक विजेअभावी अंधारात

 • bomb cyclone in denver

  डेनेव्हर - अमेरिकेतील कोलाेराडो प्रांतातील डेनेव्हर शहरात ताशी १०० किमीच्या वेगाने हिमवादळ धडकले. त्याचे बाॅम्ब सायक्लॉन असे नामकरण करण्यात आले आहे. हे वादळ पहिल्या श्रेणीतील असल्याचे सांगण्यात आले. वादळ व पावसामुळे डेनेव्हरमध्ये वेगवेगळ्या १२५ दुर्घटना घडल्या. एका घटनेत मदत पथकातील एकाचा मृत्यू झाला. डेनेव्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १ हजार ३४० विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. सरकारी कार्यालय, शाळा, बाजारपेठही बंद ठेवण्यात आली आहे.


  सुमारे ७.५ लाखांची लोकसंख्या असलेल्या डेनेव्हरमध्ये २.५ लाख लोकांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. कोलोराडो सरकारने राज्यात आणीबाणी जाहीर केली आहे. प्रशासनाने डेनेव्हरशिवाय व्योमिंग नेब्रास्का व उत्तर-दक्षिणेकडील डकोटामध्येही इशारा दिला आहे. घराबाहेर पडू नये, असे सरकारच्या आवाहन करण्यात आले आहे. शक्य झाल्यास प्रवास टाळण्याचा सल्लाही सरकारने दिला आहे. न्यू मेक्सिको, विस्कॉन्सिन, मिनिसोटा, डलास, मिशिगन, अायोवामधील परिस्थिती वाईट आहे. वादळाचा फटका ३३० लाख चौरस क्षेत्रफळावर पडल्याचे दिसून येते.


  ३०-४० वर्षांत असे घडते
  - थंडीच्या ऋतूत बॉम्ब सायक्लोन येते. या काळात हिमवृष्टीसह सोसाट्याचा वाराही असतो.
  - वादळाचे नामकरण १९४० मध्ये झाले. ३०-४० वर्षांत हे हिमवादळ येते, असे संशोधकांनी सांगितले.


  मोझांबिक : पुराचे ११५ बळी
  मापुतो दक्षिण आफ्रिका, मोझांबिक आणि मालावीत पावसाने मोठे नुकसान केले आहे. चार दिवसांपासून होत असलेला पाऊस आणि पुरामुळे झालेल्या दुर्घटनांत ११५ जण ठार झाले आहेत. सुमारे ५.५० लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे.


  केलांगमध्ये तापमान ०.८ अंश, १५ सेंमी बर्फवृष्टी
  हिमाचल प्रदेशातील लाहौल व स्पिती जिल्हा प्रशासकीय केंद्र केलांगमध्ये गुरुवारी तापमान ०.८ अंश सेल्सियसवर पोहोचले होते. हे राज्यातील सर्वाधिक थंड ठिकाण ठरले आहे. येथे १५ सेंमी बर्फ साचला आहे. डलहौजीत तापमान ०.१ अंश होते.

Trending