अशी एक शाळा / अशी एक शाळा जिथे शिक्षणाबरोबर दिले जातात बॉम्ब डिफ्युज करण्याचे व पिस्तूल चालविण्याचे धडे

दिव्य मराठी वेब टीम

Nov 10,2018 03:22:00 PM IST

दमोह - येथे अशी एक शाळा आहे जेथे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच बॉम्ब डीफ्युज करण्याचे आणि पिस्तूल चालवायचे धडेही दिले जातात. शक्यतो १२ वी पास झाल्यानंतर विद्यार्थी करिअरच्या शोधात असतात. पण आता विद्यार्थ्यांना करियरचा मार्ग ठरवण्याची संधी नववीत प्रवेशानंतरच मिळणार आहे.

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण मोहिमेअंतर्गत ९ वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता व्यवसायाशी संबंधित विषय शिकवले जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी नववीत प्रवेश केल्यापासूनच त्यांना भविष्यात कोणता व्यवसाय करायचा आहे आणि तो आपण कशाप्रकारे करू शकतो हे समजावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. .


हा विषय नववी आणि दहावी मध्ये संस्कृत विषयाला पर्यायी म्हणून घेता येऊ शकतो. तर अकरावी आणि बारावीमध्ये इंग्रजी विषयाला पर्याय म्हणून घेता येईल. त्यासाठी एक विशेष लॅब बनवण्यात अली आहे. त्यामध्ये सुरक्षेशी संबंधित सर्व उपकरणे ठेवण्यात अली आहेत. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांचा माध्यमातून परिपूर्ण होता यावे यासाठी त्याचा वापर केला जातो. यामध्ये बॉम्ब डिफ्युज करण्याबरोबर VVIP सुरक्षेसंदर्भातील उपकरणाची देखील ट्रेनिंग दिली जाते. बारावीनंतर हा कोर्स पूर्ण होतो आणि त्यांना थेट खाजगी आणि सरकारी सुरक्षा एजन्सीमध्ये प्राधान्य दिले जाते.

X
COMMENT