आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉम्बच्या अफवेने कामायनी एक्स्प्रेस थांबवून तीन तास कसून तपासणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इगतपुरी  - लोकमान्य टिळक टर्मिनसहून वाराणसीकडे जाणाऱ्या कामायनी एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याचा फोन आल्याने इगतपुरी स्थानकात थांबवून तपासणी करण्यात आली. मात्र, काहीच  न आढळल्याने  ३ तासांनंतर गाडी मार्गस्थ करण्यात आली.  
 

कामायनी एक्स्प्रेसच्या एस-४  डब्यात बॉम्ब असल्याचा फोन अजय यादव (३४) या व्यक्तीने ठाणे ग्रामीण पोलिसांना केला. याची तत्काळ माहिती पोलिसांनी कल्याण विभागाला कळवली. कल्याण रेल्वे विभागाने इगतपुरी लोहमार्ग पोलिसांना याची कल्पना दिली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, रेल्वे सुरक्षा बलाचे पोलिस निरीक्षक एस. बर्वे,  स्टेशन व्यवस्थापक प्रेमचंद आर्या यांच्या पथकाने धाव घेत ३ वाजून १५ मिनिटांनी आलेल्या कामायनी एक्स्प्रेसला थांबवून डब्यांतील सामानाची कसून झडती घेतली. मात्र, काहीच न आढळल्याने त्यांनी नाशिकच्या बॉम्ब शोध पथकाला पाचारण केले. श्वानपथकाने येत एस-४, एस-३, एस-२ डब्यांतील सर्व प्रवाशांना खाली उतरवून सामानाची झडती घेतली.  मात्र, बॉम्बसदृश वस्तू आढळून न आल्याने प्रवाशांसह पथकाने नि:श्वास सोडला. अखेर तीन तासांनंतर गाडी वाराणसीकडे रवाना करण्यात आली.    

बातम्या आणखी आहेत...