Home | Maharashtra | Vidarva | Akola | Bombing equipment seized by police in Amravati

दहशतवादविरोधी पथकाने कारवाई करत वडगाव झिरे येथे स्फोटकांचा साठा जप्त केला...

प्रतिनिधी | Update - Apr 16, 2019, 09:02 AM IST

अमरावती एटीएसकडून दोघांना अटक, एक फरार

  • Bombing equipment seized by police in Amravati
    अमरावती-निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बडनेरा ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वडगाव झिरे गावात स्फोटकांच्या साठ्यासह पोलिसांनी दोघांना अटक केली. दहशतवादविरोधी पथकाने रविवारी ही कारवाई केली. वडगाव झिरे येथील रोशन नानूजी गुज्जर विनापरवाना स्फोटक पदार्थ बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या आधारे वडगाव झिरे येथे मध्यरात्री धाड टाकून १४५ जिलेटिन कांड्या, १७८ इलेक्ट्रिक डिटोनेटर, एक डायनामोज बॉक्स व २०० मीटर इलेक्ट्रिक वायर असे साहित्य जप्त केले. लादुलाल काळुजीलाल चौधरी (काकरी खेडा, राजस्थान) व संदीप धाेंडीराम इंगळे (मलकापूर) या दोघांना पोलिसांनी अटक केली, रोशन गुज्जर पसार झाला.

Trending