आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंके पाठोपाठ नेपाळमध्येही सीरिअल ब्लास्ट; रविवारी झालेल्या स्फोटानंतर देशभरात हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना, 4 ठिकाणी सापडले बॉम्ब

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काठमांडू(नेपाळ)- नेपाळची राजधानी काठमांडुमद्ये रविवारी तीन ठिकाणी झालेल्या बॉम्बब्लास्टनंतर सोमवारी अनेक ठिकाणी हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. काठमांडुमध्ये झालेल्या स्फोटात 4 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.


पोलिसांनी सांगितले की, देशभरात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर नवलपरासी जिल्ह्यात एक ट्रक  जाळण्यात आला, तर सुरखेतमध्ये बस जाळण्यात आली. पण नेपाळी सैन्याला पोखरामध्ये तीन, अन्नपूर्णामध्ये एक आणि कास्की जिल्ह्यातील एक बॉम्ब डिफ्यूज करण्यात यश आले आहे.


नऊ संशयित ताब्यात
पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, रविवारी झालेल्या स्फोटानंतर 9 संशियताना ताब्यात घेण्यात आले आहे. या स्फोटात 9 जण जखमी झाले आहेत, तर 4 जणांचा मृत्यू झालाय. हे स्फोट काठमांडुच्या सुकेधरा, घट्टेकुलो आणि नागधुंगा परिसरात केले गेले. या स्फोटांच्या मागे प्रतिबंधित कम्युनिस्ट समुहा हात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. नेपाळ सरकारने काही दिवसांपूर्वी या समुहाच्या हिंसक कार्यांवर लगामा लावली होती. या समुहाने सोमवारी विरोध प्रदर्शनही केले होते.


देशभरात अलर्ट
पोलिसांनी सांगितले की, सोमवारी जिथे बॉम्ब लावण्यात आले होते, तो परिसर वर्दळीचा आहे. हे सर्व बॉम्ब रविवारी वापरण्यात आलेल्या बॉम्बपेक्षा जास्त घातक आहेत. या पार्श्वभूमिवर देशभारत सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तुर्तास या स्फोटांची जबाबदीर कुठल्याही संघटनेने घेतलेली नाहीये.

बातम्या आणखी आहेत...