आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Boney Gets Emotional At Biography Launch Event 'Sridevi: The Internal Screen Gods', Deepika Took Over Him

'श्रीदेवी : द ईटरनल स्क्रीन गॉडेस' या बायोपिकच्या कव्हरवर श्रीदेवीला बघून बोनी यांना अश्रू अनावर, दीपिकाने केले सांत्वन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीतील इंडिया हॅबिटेट सेंटरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. - Divya Marathi
दिल्लीतील इंडिया हॅबिटेट सेंटरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बॉलिवूड डेस्कः बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या खासगी आणि चित्रपट जीवनावर आधारित 'श्रीदेवी : द ईटरनल स्क्रीन गॉडेस' या बायोग्राफीचे रविवारी अनावरण करण्यात आले. सत्यार्थ नायक लिखित या बायोग्राफीचे अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्या हस्ते अनावरण झाले. यावेळी श्रीदेेवी यांचे पती बोनी कपूर यांना आपल्या पत्नीच्या आठवणींनी गहिवरुन आले. त्यांना अश्रू अनावर झाले. बोनी कपूर यांना भावूक झालेले बघून दीपिकाने त्यांचे सांत्वन केले. या कार्यक्रमाला दिग्दर्शिका गौरी शिंदे उपस्थित होत्या. गौरी शिंदेच्या 'इंग्लिश विंग्लिश' या चित्रपटात श्रीदेवी यांनी मुख्य भूमिका साकारली होती. 

  • बायोग्राफीची वैशिष्ट्ये :

या बायोग्राफीत सत्यार्थ यांनी श्रीदेवी यांच्या पाच दशकांच्या प्रवासाविषयी लिहिले आहे. ज्या दिग्दर्शक आणि कलाकारांनी श्रीदेवीसोबत काम केले, त्यांचे अनुभव या बायोग्राफीत आहेत.  1969 मध्ये बालकलाकाराच्या रुपात श्रीदेवी पहिल्यांदा 'थुनाइवन' या चित्रपटात झळकल्या होत्या. तर 2017 मध्ये आलेला 'मॉम' हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. या प्रवासातील अनेक किस्से या बायोग्राफीत आहेत.

  • 2018 मध्ये झाले होते निधन :

श्रीदेवी यांचे वयाच्या 54 व्या वर्षी 24 फेब्रुवारी 2018 रोजी निधन झाले होते. दुबईत त्या त्यांचा भाचा मोहित मारवाहच्या लग्नात सहभागी झाल्या होत्या. ज्या हॉटेलमध्ये त्या वास्तव्याला होत्या, त्याच्या बाथटबमध्ये बुडाल्याने त्यांचे निधन झाले होते.