आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'डोक्यापासून ते पायाच्या अंगठ्यापर्यंत बाथटबमध्ये बुडाल्या होत्या श्रीदेवी\', बोनी कपूर यांनी स्वतः सांगितली होती त्या रात्रीची संपूर्ण कहाणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


एंटरटेन्मेंट डेस्कः श्रीदेवी आज हयात असत्या तर त्यांनी वयाची 55 वर्षे पूर्ण केली असती. 13 ऑगस्ट 1963 रोजी तामिळनाडूच्या शिवकाशी येथे जन्मलेल्या श्रीदेवी यांनी यावर्षी 24 फेब्रुवारी रोजी या जगाला कायमचे अलविदा केले. दुबईतील एका हॉटेलच्या बाथटबमध्ये बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. ही घटना ज्या रात्री घडली, त्यावेळी नेमके काय घडले होते? हे स्वतः श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांनी त्यांचे मित्र आणि ट्रेड अॅनालिस्ट कोमल नाहटा यांना सांगितले होते. कोमल नाहटा यांनी ही संपूर्ण कहाणी त्यांच्या ब्लॉगवर शेअर केली होती. 

 

एक नजर टाकुयात 24 फेब्रुवारीच्या रात्री नेमके काय घडले होते यावर...
बोनी यांनी नाहटांना सांगितले होते की, "24 फेब्रुवारीला सकाळी मी तिच्याशी (श्रीदेवी) बोललो होतो. त्यावेळी तिनं मला सांगितलं की, पापा मी तुला मिस करतेय." श्रीदेवी बोनी कपूर यांना 'पापा' म्हणायच्या. 

- बोनी यांनी पुढे सांगितले होते, "मी तेव्हा तिला दुबईत येणार असल्याचं सांगितलं नाही. आईला एकटीला राहायची सवय नसल्याने जान्हवीचीही इच्छा होती की मी दुबईत जावं आणि ते तिच्यासाठी सरप्राइज होतं."

- नाहटा यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये पुढे लिहिले होते, "बोनी त्यांची 'जान' आणि दोन मुलींची आई श्रीदेवीला हॉटेलमध्ये पोहोचून सप्राईज दिलं होतं. डुप्लिकेट किल्लीने त्यांनी हॉटेलची खोली उघडली. एखाद्या नवथर जोडीसारखी त्या दोघांनी एकमेकांना मिठी मारली."

- "बोनी दुबईला येईल असा अंदाज श्रीदेवीला होताच. त्यांनी एकमेकांना किस केलं आणि अर्धा तास बोलत राहिले."

- बोनी यांनी श्रीदेवीला सांगितले की, रात्री रोमॅंटिक डिनरसाठी जाऊ आणि श्रीदेवी यांनी खरेदी पुढे ढकलावी. त्यामुळे विमानाचे तिकीट रद्द करून ते 25 फेब्रुवारीला करून घ्यायचे ठरले, जेणेकरून त्यांना खरेदीसाठी चांगला वेळ मिळेल.

 

श्रीदेवी फ्रेश व्हायला गेल्या आणि बोनी टीव्ही बघू लागले... 
- बोनी यांनी नाहटांना सांगितल्यानुसार, श्रीदेवी यावेळी निवांत मूडमध्ये होत्या. डिनरला जाण्यासाठी तयार होण्यासाठी त्या अंघोळीला गेल्या.
- बोनी यांनी नाहटांना सांगितलं की, "मी लिव्हिंग रूममध्ये गेलो आणि श्रीदेवी मास्टर बाथरूममध्ये आवरण्यासाठी गेली. लिव्हिंग रूमच्या टीव्हीवर मी दक्षिण आफ्रिका आणि भारत सामन्याचे अपडेट पाहिले त्यानंतर पाकिस्तान सुपर लीगच्या एका मॅचचे अपडेट्स पाहिले. 15 ते 20 मिनिट मी टीव्ही पाहात होतो. पण मला काळजी वाटत होती की, शनिवारी रात्री सर्व हॉटेलमध्ये गर्दी असेल."

- त्यावेळी जवळपास 8 वाजले असतील. बोनी कपूर यांनी लिव्हिंग रूममधूनच श्रीदेवींना हाक मारली. टीव्हीचा आवाज कमी करून त्यांनी पुन्हा एकदा श्रीदेवींना हाक मारली. पण त्यांनी प्रत्युत्तर न दिल्याने ते बेडरूममध्ये गेले आणि बाथरूमचा दरवाजा ठोठवला आणि 'जान, जान' अशी हाक मारली. 

- बाथरूममधून पाण्याचा आवाज येत होता. पण श्रीदेवींचा आवाज न आल्याने ते थोडे घाबरले आणि जोरात दरवाजा ढकलला. दरवाजा आतून बंद नव्हता. बोनी थोडे घाबरले होते पण पुढे जे समोर येणार होतं त्यासाठी बोनी कपूर यांची कसलीच तयारी नव्हती. बाथटब पाण्याने पूर्ण भरला होता आणि श्रीदेवी त्यात बुडाल्या होत्या. डोक्यापासून ते पायाच्या अंगठ्यापर्यंत त्या पाण्यात बुडाल्या होत्या.

- बोनी वेगाने त्यांच्या दिशेने धावले पण श्रीदेवींची कसलीच हालचाल 

जाणवली नाही.
- नाहटा यांनी पुढे लिहिले होते, "जे घडले त्यासाठी कुणाचीच मानसिक तयारी नव्हती. त्या आधी बुडल्या आणि मग बेशुद्ध झाल्या की बेशुद्ध होऊन नंतर बुडाल्या, हे कदाचित आता कधीच समजणार नाही. बाथटबमधून थोडंही पाणी बाहेर पडलं नव्हतं. त्यामुळे असं वाटतं की श्रीदेवींना या स्थितीत हालचाल करण्यासाठी एक मिनिटसुद्धा वेळ मिळाला नसावा. त्यांनी थोडे जरी हातपाय हालवले असते तर पाणी बाथटबमधून बाहेर आलं असतं. पण फ्लोअरवर जराही 

पाणी पडलेलं नव्हतं."


24 वर्षांपूर्वीसारखे होते सरप्राइज... 
- बोनी यांचे दुबईतील सरप्राइजसारखे सरप्राइज 1994 च्या बंगळूरु ट्रीपवेळी श्रीदेवी यांना दिले होते. त्यावेळी श्रीदेवी बोनी यांचे धाकटे भाऊ अनिल कपूर यांच्यासोबत मिस्टर बेचाराचे शूटिंग करत होत्या. त्यावेळी बोनी यांनी श्रीदेवी यांच्याशी रात्रभर फोनवर गप्पा मारल्या होत्या. तेव्हा श्रीदेवी यांनी बोनी यांना सांगितले होते की, सकाळी लवकर शूटिगं आहे, त्यामुळे मला झोपायचे आहे. त्या रात्री श्रीदेवी फक्त दोन ते तीन तासच झोपल्या होत्या. सकाळी उठल्यानंतर त्यांनी मेकअपसुद्धा केला नव्हता, की बोनी त्यांना सरप्राइज देण्यासाठी तेथे हजर झाले. बोनी श्रीदेवी यांच्या रुमबाहेर उभे होते. चित्रपटाची संपूर्ण टीम बोनी यांच्या अचानक आल्याने अचंबित झाली होती. सगळ्यांना असे वाटले होते की, ते त्यांचे धाकटे भाऊ अनिल कपूरची भेट घ्यायला आले होते. कारण त्यावेळी बोनी अनिल कपूर यांचे काम सांभाळत होते. त्यावेळी बोनी यांनी श्रीदेवी यांना बंगळूरुची सैर घडवली होती.       

बातम्या आणखी आहेत...