आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Boney Kapoor Is Going To Make A Remake Of 'Mr. India', Said, 'After Death Of Sridevi, I Have Many Reasons To Remake This Film'

'मिस्टर इंडिया' या चित्रपटाचा रीमेक बनवणार आहेत बोनी कपूर, म्हणाले - 'श्रीदेवींच्या जाण्यानंतर हा चित्रपट परत करण्याची आहेत खूप करणे' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : श्रीदेवी यांच्या निधनाच्या एका वर्षांनंतर बोनी कपूर यांनी 1987 चा ब्लॉकबस्टर चित्रपट 'मिस्टर इंडिया' पुन्हा बनवण्याची घोषणा केली आहे. बोनी यांनी डीएनएला दिलेल्या एका इंटरव्यूमध्ये सांगितले, 'श्रीदेवी यांच्या निधनानंतर हा चित्रपट पुन्हा बनवण्याची माझ्याकडे खूप करणे आहेत.' 

 

रिमेकनंतर बनेल सीक्वल... 
पुढे बोनी कपूर म्हणाले, 'आधी या चित्रपटाचा सीक्वल बनवण्याची चर्चा केली जात होती, पण आता आम्ही ठरवले आहे की, आधी आम्ही हा चित्रपट नवीन कलाकारांसोबत पुन्हा बनवू आणि त्यांनतर त्याच्या सीक्वलसोबत फ्रेंचायजीची निर्मिती करू. 

 

चित्रपटाच्या 32 व्या अॅनिव्हर्सरीला करण्यात आली घोषणा... 
चित्रपटाचे डायरेक्टर असलेले शेखर कपूर आणि लीड रोलमध्ये दिसलेले अनिल कपूर यांनी चित्रपटाच्या 32 व्या अॅनिव्हर्सरीला (25 मे) या सिनेमाच्या सीक्वलबद्दल हिंट दिली होती. पण याच्या काही दिवसानंतर बोनी यांनी स्पष्ट केले की, आधी चित्रपटाचे रिबूट व्हर्जन बनेल आणि त्यांनतर याच्या सीक्वलवर काम केले जाईल. 

 

त्यावेळी खर्च झाले होते 4 कोटी रुपये... 
पहिल्या चित्रपटाची आठवण सांगत बोनी म्हणाले - 'आम्ही या चित्रपटावर 4 कोटी रुपये खर्च केले होते. त्यावेळेनुसार, या चित्रपटावर एवढे पैसे लावणे खूप मोठी गोष्ट होती. वरसोवा बीचजवळ त्याचा भव्य सेट लावला गेला होता. मोगॅम्बोचा रोल अमरीश पुरी यांनी केला आणि त्या भूमिकेने चित्रपटांत जीव आणला होता. सोबतच या चित्रपटापूर्वी श्रीदेवी यांची ग्लॅमरस अभिनेत्रीची इमेज होती. पण या चित्रपटाने लोकांच्या मनात आणि डोक्यात त्यांची प्रतिमा बदलून टाकली. तसेच अनिल कपूर यांचेही एक अभिनेता म्हणून खूप कौतुक करण्यात आले होते.   

 

बोनी यांना जेव्हा प्रश्न विचारला गेला की, यावेळीही चित्रपटाचे दिग्दर्शन शेखर कपूरच करतील का. तेव्हा यावर प्रोड्यूसरने उत्तर दिले जर शेखर फ्री असेल तर तो या चित्रपटाचा भाग बनू शकतो.