आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Boney Kapoor With Daughter Anshula And Khushi But Jhanvi Kapoor Gets Single Entry In Deepveer Reception

अर्जुन कपूर, जान्हवी, अंशुला आणि खुशी, बोनी कपूरची चारही मुले एकाच पार्टीत, पण तरीही राहिले दूरदूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : दीपिका आणि रणवीरच्या रिसेप्शनला बोनी कपूर यांची चारही मुले हजर होती. एकाच पार्टीत असूनही हे चौघे दूरदूर राहिले. बोनी कपूर यांनी अंशुला आणि खुशी या आपल्या मुलींसोबत एन्ट्री घेतली. हे तिघेही ब्लॅक कलरच्या मॅचिंग ऑऊटफिटमध्ये होते. जान्हवी कपूरने एकटीने एन्ट्री घेतली. तिने सिल्व्हर आणि लेमन कलरचे कॉम्बिनश असलेला ड्रेस परिधान केला होता. त्यानंतर अर्जुन कापूरनेही एकट्याने एन्ट्री घेतली. या सर्व भावंडांनी मीडियासमोर वेगवेगळे फोटोज काढले. यावेळी पहिल्यांदाच असे झाले की, एकाच पार्टीत असूनही बोनी कपूर यांच्या फॅमिलीने एकही फॅमिली फोटो घेतला नाही. वास्तविक दरवेळी जेव्हा बोनी कपूर त्यांच्या फॅमिलीसोबत एखाद्या पार्टीला जातात तेव्हा ते सगळे मिळून फॅमिली फोटोज काढताच. पण यावेळी सगळेच वेगवेगळे दिसले. 

 

टॉक शो दरम्यान केलेल्या एका मस्करीमुळे  ट्रोल झाली होती अंशुला.. 
'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात जान्हवी आणि अर्जुनने सांगितले होते की, बोनी कपूर छोटी मुलगी खुशीवर जास्त प्रेम करतात. यावेळी जान्हवी हेही म्हणाली होती की, तिला घरात कुणीच प्रेम करत नाही. यावर अर्जुन कपूरची बाजू घेत अंशुला जान्हवीला म्हणाली होती, की तिला खूप वाईट वाटले आहे. वास्तविक ही सगळी मस्करी होती पण त्यानंतर सोशल मीडिया यूजर्सने अंशुलाला ट्रोल करायला सुरुवात केली. त्यामुळे अर्जुन खूप नाराज झाला होता. नंतर जान्हवीने स्पष्ट केले होते की, तिच्यात आणि अंशुलामध्ये कसलाही ताणतणाव किंवा वाद नाही. 

 

बातम्या आणखी आहेत...