आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेखर घोष | नवी दिल्ली देशभरातील रेल्वे प्रवाशांना आता आपल्या लगेजच्या बुकिंगसाठी पार्सल कार्यालयात जाण्याची गरज नाही. रेल्वे लवकरच ई-तिकिटाच्या धर्तीवर ई-लगेज सुविधा देणार आहे. सध्या ही सुविधा ई-तिकीट बुक करणाऱ्यांनाच मिळू शकणार आहे. नंतर सर्वच प्रवाशांना याचा लाभ मिळेल. रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन (क्रिस) सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्याचे काम सुरू झाले आहे. पुढील महिन्यात दिल्ली, जयपूर व आग्रा विभागात ही योजना सुरू होऊ शकते. येत्या १८ सप्टेंबरला दिल्ली, आग्रा व जयपूर विभागातील वरिष्ठ विभागीय व्यवस्थापकांची बैठक बोलावण्यात आली असून ठराविक वेळेत अवजड सामान घेऊन जाण्यासाठी प्रवाशांना त्याचे बुकिंग करावे लागते. यासाठी स्टेशनवर पार्सल कार्यालयात जावे लागते. बुकिंग न करता ठरावीक वजनापेक्षा अधिक जड सामान घेऊन जाणाऱ्या प्रवाशांना ६ पट दंड द्यावा लागतो. ही योजना पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू केली जात आहे. १८ डिसेंबरला यावर चर्चा होईल. याच बैठकीत याचे दर व ती रक्कम देण्याची पद्धत यावर चर्चा होईल. - दीपक कुमार, सीपीआरओ, उत्तर रेल्वे
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.