आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त 12 हजारात करा गोव्याचा प्रवास, आयआरसीटीसीने आणला नवीन Goa Delight पॅकेज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क- देशात फिरण्यासाठी पर्यटकांची पहिली पसंती गोव्याला असते. त्यामुळे तुम्हाला गोव्यात सुट्ट्या एन्जॉय करायच्या असतील तर तुमच्यासाठी एक चांगला प्लॅन सुरू आहे. आयआरसीटीसीने तुमच्यासाठी खास गोवा टूर पॅकेज आणले आहे. Goa Delight असे या पॅकेजचे नाव आहे. पॅकेजमध्ये 2 नाइट आणि 3 दिवसांचा टूर सामिल आहे. IRCTC ची वेबसाइट www.irctctourism.com वर दिलेल्या माहितीनुसार या पॅकेजची सुरुवात 8 सप्टेंबरपासून होईल.

 

हैदराबादवरून सुरू होईल ही टूर
गोवासाठी ही टूर हैदराबाद वरून सुरू होईल. यात प्रवाशांना इंडिगो फ्लाइटच्या इकोनॉमी क्लासने प्रवास करण्याची संधी मिळेल. हैदाराबादवरून गोव्यासाठी फ्लाइट 8 सप्टेंबरला सकाळी 8.35 वाजता उड्डाण घेईल. तर परतीसाठी गोव्यावरून हैदराबादसाठी 10 सप्टेंबर 21.40 वाजता असेल. 


टूरमध्ये मिळतील या सुविधा
गोवा टूर पॅकेजमध्ये इंडिगो एअर लाइनने प्रवास करण्याशिवाय ट्रॅवल इंश्योरेंस, ब्रेकफास्ट आणि डिनरची सुविधा असेल. त्यासोबतच तुम्हाला पॅराडाइज विलेज बीच रिसोर्टमध्ये राहण्याची संधी मिळेल. तुम्हाला गोव्यातील अनेक जागा दाखवल्या जातील. 


पॅकेजची किंमत
आयआरसीटीसीचा हा पॅकेज निवडल्यावर तुम्हाला सिंगल ऑक्यूपेंसीसाठी 16,415 रूपये द्यावे लागतील. डबल ऑक्यूपेंसीसाठी 12,955 रूपये प्रती व्यक्ती द्यावे लागतील. तर ट्रिपल ऑक्यूपेंसीसाठी 12,625 रुपये प्रती व्यक्ती द्यावे लागतील. तुमच्यासोबत 2 ते 10 वर्षापर्यंतचा मुलगा असेल तर 10,980 रूपये द्यावे लागतील. 

बातम्या आणखी आहेत...