आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनच्या पंतप्रधानांचा अमेरिकेत जन्म, पत्रकाराच्या नोकरीतून डच्चू दिला होता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोरिस जॉन्सन मोठे गमतीशीर व्यक्तिमत्त्व...हास्य विनोद करण्याचा त्यांचा स्वभाव...! ते लोकप्रिय असण्याचे कारण हेच आहे. ब्रिटनमधील एक मासिक प्रायव्हेट आयच्या संपादिका इयान हिसलप बाेरिस यांच्याबाबत सांगतात की, ते त्यांच्यातील वागणुकीमुळे एकमेक फील गुड असणारे नेते आहेत. अन्य नेते नेहमी जबाबदारीचे कारण देत व्यग्र राहतात. याच कारणास्तव बोरिस यांची अनेक टोपण नावे आहेत. कॉमिक “बिनो’च्या नावाशी मिळतेजुळते बिनो-बोरिस, बोजोसारखे नाव आहे. २००८ मध्ये लंडन महापौर निवडणूक प्रचाराआधी द वॉल स्ट्रीट जनरलला दिलेल्या मुलाखतीत बोरिस यांनी सांगितले होते की,विनोद करणे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाेहोचण्याचे माध्यम आहे. विनोदामुळे तुमचे म्हणणे लाेकांत केवळ सहज पोहोचते असे नव्हे, तर लोकांना तुम्ही जास्त कट्टर आणि महत्त्वाकांक्षी वाटत नाहीत.


बोरिस यांचे चरित्र लिहिणाऱ्या सोनिया परनेल याला योगायोग मानत नाहीत. सोनिया द डेली टेलिग्राफमध्ये त्यांच्या सहकारी होत्या. आत्मचरित्र “ए टेल ऑफ ब्लाँड अॅम्बिशन...’मध्ये लिहिले की, लोक लवकर कपडे लवकर बदलत नाहीत, बोरिस विचार बदलतात. 


भारताचा जावई म्हणून घेतात : बोरिस यांचा जन्म न्यूयॉर्कमध्ये झाला. आई-वडील दोघेही ब्रिटिश वंशाचे होते, त्यामुळे बोरिस यांच्याकडे अमेरिका व ब्रिटन दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे. वडील वर्ल्ड बँकेत होते. आपल्या करिअरमध्ये त्यांनी अनेक नोकऱ्या बदलल्या. आई चित्रकार होती. बोरिस यांची पहिली पत्नी एलिग्राशी त्यांचा १९९३ मध्ये घटस्फोट झाला. दुसरे लग्न मरीना व्हिलरशी झाले. मरीनाची आई दीप व्हीलर भारतीय वंशाच्या होत्या. दीप यांचे पहिले लग्न खुशवंत सिंगांचे भाऊ दलजीत सिंगांशी झाले होते. यानंतर दोघे विभक्त झाले. बोरिस यांचा २०१८ मध्ये मरीनाशी घटस्फोट झाला. बोरिस यांच्या कुटुंबात वडील, बहीण रेशेलही लेखक आहेत. बोरिस यांनीही डझनभर पुस्तके लिहिली आहेत.


ट्रम्प आणि बोरिस जॉन्सन यांच्यातील साम्य
1. ट्रम्प यांच्या निवडणूक अजेंड्यात प्रामुख्याने मेक्सिको भिंत उभारणीचा समावेश होता.बोरिस यांचा मुद्दा ब्रेक्झिट आणणे होता. दोघांनी एक प्रकारे लोकांची नस पकडली आहे.
2. बोरिस व ट्रम्प दोघे रेसिस्ट, सेक्सिस्ट व इस्लामविरोधातील टिप्पणी करण्यासाठी बदनाम आहेत. इस्लाममुळे मुस्लिम देश पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत अनेक दशके मागे असल्याचे बोरिस म्हणाले होते. बुरखा घातलेल्या महिलांना मेलबॉक्स म्हटले होते. ट्रम्प यांनीही इस्लाम व महिलांविरुद्ध व्यक्त्व्य केले.
3. ट्रम्प व बोरिस दोघांना माध्यमाची पार्श्वभूमी आहे. ट्रम्प द अप्रेंटिस टीव्ही शो करत होते, बोरिस हॅव आय गॉट न्यूज फॉर यू शो करतात.
4. बोरिस व ट्रम्प दोघेही पारंपरिक  राजकीय नेत्याच्या प्रतिमेत बसत नाहीत. ट्रम्प यांच्यावर प्रोटोकॉलचे उल्लंघन, मीडियावर आरोपाचे आरोप लागले.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्याआधी ट्रम्प प्रसिद्ध उद्योगपती म्हणून ओळख.जॉन्सन याची पत्रकार म्हणून सुरुवात. त्यानंतर लंडनचे महापौर,परराष्ट्रमंत्री आणि आता पंतप्रधान झाले.

बातम्या आणखी आहेत...