आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

New UK PM / ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार बोरिस जॉन्सन, निवडणुकीत जेरेमी हंट यांना केले पराभूत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - बोरिस जॉन्सन यांची ब्रिटनच्या पंतप्रधान पदी निवड करण्यात आली आहे. युरोपियन युनियनपासून ब्रिटनच्या एक्झिटवरून सुरू असलेल्या पेचप्रसंगात 7 जून रोजी थेरेसा मे यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता. त्याच ठिकाणी कंझर्वेटिव्ह पक्षाने जेरेमी हंट किंवा बोरिस जॉन्सन यापैकी एकाला पंतप्रधान पद मिळवून देण्यासाठी नामनिर्देशित केले होते. यानंतर सत्ताधारी पक्षाने एकमताने बोरिस यांना आपला नेता निवडले आहे.

 

ब्रिटनच्या पंतप्रधान पदासाठी सत्ताधारी पक्ष कंझर्वेटिव्हने नेता निवडण्याची प्रक्रिया सोमवारीच पूर्ण केली. यामध्ये पार्टीचे 1.60 लाख कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली. यापैकी 92,153 जणांनी बोरिस यांना आणि 46,656 जणांनी जेरेमी हंट यांना पसंती दिली होती. पक्षाच्या एकूण पदाधिकाऱ्यांपैकी 87.4% लोकांनी या मतदानात सक्रीय सहभाग नोंदवला. ब्रिटनचे पंतप्रधान होण्यापूर्वी बोरिस लंडनचे मेअर आणि ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री देखील होते. त्यांनी मंगळवारी निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांचे आभार मानले. सोबतच आता काम करण्याची वेळ आहे असे ते म्हणाले.


बोरिस जॉन्सन यांनी ब्रेक्झिट अर्थात ब्रिटनच्या युरोपियन युनियनमधून एक्झिटवर म्हटले, की एका दैनिकात वाचले की कुठल्याही नेत्याने एवढ्या भयंकर परिस्थितीचा सामना केलेला नाही. त्यांनी लोकांनाच विचारले, तुम्हाला भीती वाटते का? मला तर तुम्ही मुळीच घाबरलेले वाटत नाहीत. थेरेसा मे यांच्या राजीनाम्यानंतर बोरिस जॉन्सन पंतप्रधान पदासाठी सर्वात पुढे होते. अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी पंतप्रधान होण्याची आणि ब्रिटनला चांगला ब्रेक्झिट करार मिळवून देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्यात आणि जेरेमी हंट यांच्यात एका महिन्यापासून पंतप्रधान पदावरून शर्यत सुरू होती.

बातम्या आणखी आहेत...