आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुली होऊन जन्माला आल्या होत्या जुळ्या बहिणी, आता म्हणतात 'आम्ही दोघे भाऊ-भाऊ'; सेक्स चेंज करून बनले पुरुष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - अमेरिकेतील मॅरिलंड प्रांतात राहणाऱ्या मुली होऊन जन्माला आलेल्या दोन सख्ख्या जुळ्या बहिणी आता पुरुष झाल्या आहेत. जॅक आणि जेस ग्रेफ अशी या दोघांची नावे असून आता त्यांचे वय 23 वर्षे आहे. त्यांचा जन्म मुलींच्या शरीरात झाला होता. आई-वडिलांनी अतिशय लाडाने त्यांना वाढवले. परंतु, वयाच्या 15 व्या वर्षी आपण चुकीच्या शरीरात आहोत असे त्यांना कळाले होते. लहानपणी सुद्धा झोपताना त्या देवाकडे प्रार्थना करायच्या की सकाळी आम्हाला जादूने पुरुष कर. वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी आपण ट्रान्सजेंडर आहोत असे जाहीर केले. 


अशा बनल्या पुरुष...
- मॅरिलंडच्या बाल्टिमोर येथे राहणाऱ्या ग्रेफ जून 1995 मध्ये दांपत्याच्या घरात जुळ्या मुलींचा जन्म झाला होता. त्यांनी आपल्या मुलींची नावे जॅकलीन आणि जेनिफर अशी ठेवली. अगदी लाडाने या दोघांच्या सर्वच मागण्या पूर्ण केल्या. परंतु, वय वाढत असताना आपण चुकीच्या शरीरात आहोत अशी जाणीव या दोघांना झाली. वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी आपण दोघेही ट्रान्सजेंडर आहोत असा उलगडा त्यांना झाला. त्यांनी ही गोष्ट आई-वडिलांना सांगितली आणि सर्जरी करून पुरुष होण्याचा निर्णय घेतला. 
- या दोघींचाही डीएनए एकसारखाच आहे. सेक्स चेंज सर्जरी करण्यासाठी 2017 मध्ये त्यांनी हार्मोन्स आणि टेस्टोस्टेरॉनचे ट्रीटमेंट सुरू केले. यानंतर नुकतीच ब्रेस्ट सर्जरी केली. आता ह्या दोघी पूर्णपणे पुरुष बनल्या असून त्यांची नावे जॅक आणि जेस अशी आहेत. आतापर्यंत आपण चुकीच्या शरीरात होतो आणि दुसऱ्यांनाही याबद्दल जागरुक करणार असा निर्णय त्यांनी घेतला. 


आता लोकांना करत आहेत जागरुक
जॅक आणि जेसने अज्ञानामुळे आपल्यासोबत जे घडले तसे दुसऱ्यांसोबत घडू नये यासाठी सोशल मीडियावर आपली स्टोरी शेअर केली. तसेच या माध्यमातून ते लोकांना जागरुक करत आहेत. जॅकने सांगितल्याप्रमाणे, "वयाच्या 15 व्या वर्षी सुद्धा आमच्या शरीरात होणाऱ्या बदलांची आम्हाला काहीच माहिती नव्हती. वाढत्या वयासोबत शरीरात ब्रेस्ट आणि इतर पुरुषी बदल घडून येत होते. आमच्या शरीरातील बदलांना ट्रान्सजेंडर असे म्हटले जाते याची कल्पनाही त्यावेळी आम्हाला नव्हती. लहानपणी झोपताना आम्ही देवाकडे प्रार्थना करत होतो की सकाळपर्यंत आम्हाला पुरुष बनव. आम्ही जो निर्णय उशीरा घेतला तो आमच्यासारखे लोक आमची स्टोरी वाचून लवकरात लवकर घेऊ शकतील." 


दोघांनाही मिळाल्या गर्लफ्रेंड

जॅक आणि जेस आता पूर्णपणे पुरुष बनल्या आहेत. त्यांना अगदी सामान्य तरुणांप्रमाणे दाढी मिश्या आल्या. एवढेच नव्हे, तर दोघांना गर्लफ्रेंड सुद्धा आहेत. त्यापैकी एक भाऊ जॅकने आपल्या गर्लफ्रेंडसोबत नुकताच साखरपुडा केला आहे. या दोघांनीही क्रिमिनल लॉमध्ये ग्रॅजुएशन केले असून सध्या पोलिस अधिकारी आहेत.

बातम्या आणखी आहेत...