Home | Jeevan Mantra | Dharm | Born in Lumbini And Death in Kushinagar, 5 Important Places Related to Gautama Buddha's Life

लुम्बिनीत झाला होता जन्म तर कुशीनगरमध्ये केला देह त्याग, गौतम बुद्धांच्या जीवनाशी संबंधीत 5 महत्वपूर्ण गावे

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 18, 2019, 12:00 AM IST

वैशाख पोर्णिमा इ.स.पूर्व 563 साली झाला गौतम बुद्धांचा जन्म

 • Born in Lumbini And Death in Kushinagar, 5 Important Places Related to Gautama Buddha's Life

  जीवन मंत्र डेस्क - नेपाळच्या लुम्बिनी येथे इ.स.पूर्व 563 साली वैशाख पोर्णिमेला गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. यामुळे या दिवसाला बौद्ध पोर्णिमा म्हटले जाते. इ.स.पूर्व 528 मध्ये वैशाख पोर्णिमेच्याच दिवशी बद्धांना बोधगया येथे एका वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली होती. कुशीनगर येथे याच दिवशी वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी देह त्याग केल्याचे मानले जाते. अंदाजे 2500 वर्षांपूर्वी गौतम बुद्धांनी देह त्याग केल्यानतंर त्यांच्या अस्ती आठ भागांत विभागल्या गेल्या. या आठ भागांवर स्तूप उभारण्यात आले आहेत. नेपाळमधील कपिलवस्तुच्या स्तूपात ठेवण्यात आलेल्या अस्ती या गौतम बुद्धांच्या असल्याचे मानले जाते. याशिवाय त्यांच्या आयुष्याशी निगडीत आणखी 5 महत्वपूर्ण ठिकाणे आहेत.


  1. लुम्बिनी

  उत्तर प्रदेशच्या ककराहा गावापासून 14 मैल आणि नेपाळ-भारत सिमेपासून दूर असलेले रुमिनोदेई नामक गाव लुम्बिनी आहे. गौतम बुद्धांचे जन्मस्थान म्हणून हे गाव प्रसिद्ध आहे.


  2. बोधगया
  बिहारच्या प्रमुख हिंदू पितृ तीर्थ 'गया' येथे बोधगया गाव आहे. गया हा बिहारमधील एक जिल्हा आहे. बुद्धांनी येथे एका वृक्षाखाली ज्ञान प्राप्त केले होते.


  3. सारनाथ
  हे ठिकाण उत्तरप्रदेशच्या वाराणसीजवळ स्थित आहे. गौतम बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर आपला पहिला उपदेश याच ठिकाणी दिला होता. येथूनच त्यांनी धम्मचक्र प्रवर्तनचा प्रारंभ केला होता.

  4. कुशीनगर
  उत्तरप्रदेशच्या देवरिया जिल्ह्यातील या ठिकाणी महात्मा बुद्धांचे महापरिनिर्वाण (मोक्ष) झाले होते. गोरखपूर जिल्ह्यातील कसिया येथे एक प्राचीन कुशीनगर आहे. येथे बुद्धांच्या आठ स्तूपांपैकी एक स्तूप आहे. येथेच बुद्धांची अस्ती ठेवण्यात आली आहेत.

  5. श्रावस्ती का स्तूप
  बहराइचपासून 15 किमी दूर सहेठ-महेठ एक प्राचीन श्रावस्ती गाव आहे. गौतम बुद्धांनी बराच काळ येते वास्तव्य केले. बुद्धांनी 27 वर्षा याठिकाणी वास्तव्य केल्याचे सांगितले जाते. नास्तिकांना योग्य मार्ग दाखविण्यासाठी तथागतांनी याठिकाणी अनेक चमत्कार केले होते. या चमत्कारामध्ये त्यांनी आपले अनेक रूपांचे दर्शन घडवले. आता याठिकाणी बौद्ध धर्मशाळा, बौद्ध मठ आणि भगवान बुद्धांचे मंदिर आहे.

Trending