Home | National | Other State | boss kidnapped and tortured by employees due to no salary after 7 month

सात महिन्यांपासून मिळत नव्हता पगार, पैसे मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी केले बॉसचे अपहरण, नंतर झाले असे...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 11, 2019, 11:12 AM IST

कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी बॉसचे केले अपहरण

  • boss kidnapped and tortured by employees due to no salary after 7 month


    बंगळुरू- मागील 7 महिन्यांपासून पगार मिळत नसल्याने एका प्रायव्हेट कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी चक्क बॉसलाच किडनॅप केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात चार कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सांगितले की, सुजय नावाचा व्यक्ती बंगळुरूच्या हलासुरू परिसरात एक खासगी कंपनी चालवतात. कर्मचाऱ्यांनी आरोप लावला आहे की, मागील 7 महिन्यांपासून त्यांचा पगार दिलेला नाहीये, त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले.


    - बंगळरूमध्ये एक प्रायव्हेट कंपनीमध्ये मागील 7 महिन्यांपासून कर्मचाऱ्यांची पगार मिळाली नव्हती. तर मॅनेजमेंटकडूनही समाधानकारक उत्तर मिळत नव्हते. त्यानंतर 7 कर्मचाऱ्यांनी बॉसला किडनॅप करून पगार मिळवण्याचा प्लॅन केला. किडनॅप केल्यानंतर त्यांनी बॉसला टॉर्चर देखील केले.


    - 21 मार्चला कर्मचाऱ्यांनी बॉसला किडनॅप करून एका मित्राच्या घरी डांबून ठेवले. या दरम्यान त्यांनी बॉसला मारहाण करून आपल्या पगारीच मागणी केली. त्यानंतर पगार देतो असे आश्वास दिल्यानंतरच बॉस सुजयला सोडण्यात आले.

Trending