आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करान्यूज डेस्क - बुलंदशहरचा रहिवासी असलेल्या सुरेशला पहिल्यांदाच जेव्हा मूत्रपिंडाचा (किडनी) आजार झाला तेव्हा चक्क किडनी ट्रान्सप्लांट करण्याची नितांत गरज होती. घरातील कुठलाही पुरुष अंगदानासाठी तयार नव्हता. त्याचवेळी सुरेशच्या आईने आपली एक किडनी दान करून मुलाचा जीव वाचवला. परंतु, 5 वर्षांपासून अनियमित डायटिंगमुळे पुन्हा मूत्रपिंडाचा त्रास सुरू झाला आणि पुन्हा किडनी निकामी झाली. यावेळी सुद्धा कुठल्याही पुरुषाने सुरेशला किडनी देण्यात पुढाकार घेतला नाही. तेव्हा, पत्नीने आपले मूत्रपिंड दान करून पतीचा जीव वाचवला. परंतु, काही कारणास्तव ही किडनी शरीराला पुरक ठरली नाही आणि पुन्हा एका मूत्रपिंडाची गरज पडली. आश्चर्याची बाब म्हणजे, तिसऱ्या वेळी सुद्धा घरातील महिलेने अर्थातच सुरेशची 21 वर्षीय मुलगी काजलने आपली एक किडनी वडिलांना दिली. सध्या हे दोघेही सुखरूप आहेत.
किडनी ट्रान्सप्लांट करणारे नोएडाच्या जेपी रुग्णालयातील डॉ. अमित देवरा यांनी सांगितले, किडनी डोनेट केल्याने कुणाला काहीच त्रास होणार नाही. डोनरला केवळ निश्चित दिनचर्या आणि आवश्यक सावधगिरी बाळगण्याची गरज राहील. सुरेश डायबेटिक आहे. त्यामुळेच, 2011 मध्ये त्याचे दोन्ही मूत्रपिंड पूर्णपणे निकामी झाले होते.
65% किडनी दान करणाऱ्या महिलाच
जेपी रुग्णालयातील न्युरोलॉजिस्ट डॉ. अमित देवरा यांनी सांगितल्याप्रमाणे, रुग्णालयात आतापर्यंत 500 मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले आहेत. यातील 65 टक्क्यांहून अधिक डोनर महिलाच आहेत. त्यातही प्रामुख्याने पत्नींनी आपल्या पतींना दान केल्याचे प्रमाण अधिक आहे. बहुतांशवेळा किडनी दान केल्याने दैनंदिन आयुष्यावर अतिशय वाइट परिणाम होईल या गैरसमजुतीतून पुरुष मूत्रपिंड दान करत नाहीत. एखाद्या व्यक्तीला बालपणापासून किडनीचा आजार नाही, त्याने किडनी दान केल्यास काहीच समस्या येत नाही.
या कारणांमुळे उद्भवतात मूत्रपिंडाचे आजार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.