आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या दाेघा प्राध्यापकांना अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- बारावीत उत्तीर्ण करण्यासाठी शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार पीडित विद्यार्थिनीने केल्यानंतर पंचवटी महाविद्यालयातील सचिन निशिकांत साेनवणे व प्रवीण दादाजी सूर्यवंशी या प्राध्यापकांविरुद्ध अाडगाव पाेलिसांनी तत्काळ विनयंभगाचा गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली. त्यांना न्यायालयात त्यांना हजर केले असता न्यायालयीन काेठडी सुनावण्यात अाली. त्यानंतर दाेघांची जामिनावर मुक्तता करण्यात अाली. दरम्यान, संबंधित प्राध्यापकांच्या चाैकशीसाठी पंचवटी महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून समिती नियुक्त करण्यात अाल्याचे सांगण्यात अाले. 


अाडगाव पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने २०१५ मध्ये महाविद्यालयात अकरावीला वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला हाेता. त्यानंतर दुसऱ्या वर्षी बारावीत असताना संशयित प्रा. सोनवणे व प्रा. सूर्यवंशी यांनी वर्गात विद्यार्थ्यांना करिअरबाबत चिठ्ठीत लिहून देण्यास सांगितले. त्यावेळी दोघा प्राध्यापकांनी हाताला अाक्षेपार्ह स्पर्श करीत लज्जा निर्माण होईल अशी वर्तणूक केली. या प्रकारामुळे पीडितेला मानसिक धक्का बसल्याने २०१६ पासून तिची महाविद्यालयात जाण्याची मानसिकताच हाेत नव्हती. त्यामुळे ती वारंवार बारावीमध्ये नापास हाेत हाेती. मंगळवारी (दि. १८) दोघांनी पीडितेची पुन्हा भेट घेत, त्यापूर्वी केलेल्या शारीरिक संबंधाच्या मागणीची अाठवण करून दिली. 'आम्ही दिलेल्या प्रपोजलचा विचार केला की नाही?' असा प्रश्न विचारून तिच्याशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला. तिने घरी जाऊन घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर तातडीने वडिलांनी पीडितेसह पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार कथन केला. वरिष्ठ निरीक्षक सूरज बिजली यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ दोघा प्राध्यापकांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करीत अटक केली. 


विद्यार्थ्यांमध्ये संताप, पाेलिसांच्या भूमिकेवर संशय 
पंचवटी महाविद्यालयात घडलेल्या या प्रकाराने विद्यार्थिनींमध्ये संतापाची लाट निर्माण झाली अाहे. संबंधित प्राध्यापकांविरुद्ध संस्थेने तातडीने कारवाई करण्याची मागणी केली जात अाहे. दरम्यान, अाडगाव पाेलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करीत प्राध्यापकांना अटक केल्याच्या कारवाईबद्दल कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले. मात्र, न्यायालयात हजर करताच दाेघांंना जामीन झाल्याने पाेलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात अाहे. पाेलिसांनी जामिनास जाेरदार विराेध केला असता तर संशयितांना पाेलिस काेठडी अथवा त्यांची कारागृहात रवानगी झाली असती, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात अाहे. 


संस्थेकडून गंभीर दखल 
महाविद्यालयात घडलेल्या या प्रकाराची संस्थेने गंभीर दखल घेतली अाहे. संबंधित प्राध्यापकांच्या चाैकशीसाठी समिती नियुक्त केली असून चाैकशीअंती त्यांच्यावर याेग्य ती कारवाई केली जाईल. मात्र, पीडित मुलीने अथवा तिच्या कुटुंबीयांनी २०१६ मध्येच तक्रार करायला हवी हाेती. तिला महाविद्यालय स्तरावरील विषयांत चांगले गुण देण्यात अाले अाहेत. परंतु, ती बाेर्डाच्या परीक्षेत नापास हाेत हाेती. यामागे काही राजकीय हेतू असण्याची शक्यता अाहे. - प्राचार्य बापू जगदाळे, लाेकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय, पंचवटी 

 

बातम्या आणखी आहेत...