आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Botox Injection Caused The Lip Of This Woman To Swell Like Baloon, Shared Shocking Photos Of How She Almost Lost One

सुंदर दिसण्याच्या नादात तरुणीने केले स्वत:चेच नुकसान; बोटोक्स पार्टीत मैत्रिणीने दिले चुकीचे इंजेक्शन...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्मिंघम- इंग्लंडमध्ये एका तरुणीला बोटोक्स पार्टी चांगलीच महागात पडली. रेचल (वय 29) असे या तरुणीचे नाव असून सुंदर दिसण्याच्या नादात तिला आपले ओठ कापण्याची वेळ आली. काही दिवसांपूर्वी ती आपल्या मित्राच्या घरी बोटोक्स पार्टीसाठी गेली होती. तिथे पार्टीमध्ये अनेक लोक इंजेक्शनचा वापर करुन आपल्या शरीराचे अनेक अंग मोठे करण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे रेलचनेही दारुच्या नशेत स्वस्त किंमतीचे बोटोक्स इंजेक्शन घेतले. इंजेक्शन घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रेचलची प्रकृती बिघडली आणि तिला वेदना होऊ लागल्या. 

 

निकृष्ट दर्जाच्या बोटोक्स इंजेक्शन घेतल्यामुळे ओठांना गंभीर सूज  

निकृष्ट दर्जाच्या इंजेक्शनमुळे रेचलच्या ओठांना संक्रमण झाले. त्यामुले तिच्या ओठांना सूज येऊन तिला असह्य वेदना होऊ लागल्या. त्यानंतर रेचल ओठांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांकडे गेली. परंतू डॉक्टरांनी तिला सांगितले की, हे इंजेक्शन देणाऱ्या महिलेकडून डिझॉल्व्हचे इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर रेचल त्या महिलेकडे गेली. तिथे महिलेने रेचलच्या ओठांवर डिझॉल्व्हींगचे औषध टाकून तिच्यावर उपचार सुरू केले. जवळपास 3 दिवस उपचार झाल्यानंतर हळुहळु रेचलचे ओठ पूर्ववत झाले.

 

डॉक्टरांनी सांगितले की, 'रेचलच्या ओठांवर चुकीच्या ठिकाणी इंजेक्शन दिल्यामुळे औषधचा उलटा परिणाम झाला आणि तिच्या ओठांना सूज आली. या सूजेमुळे सहन न होणाऱ्या वेदनेने तिचा मृत्यूदेखील झाला असता.' 

बातम्या आणखी आहेत...