आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सागर किनाऱ्यावरील बाटल्यांपासून बनवली बाॅटल-बाेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य आफ्रिकेतील कॅमरूनच्या इस्माईल इबाेन या युवकाने समुद्रात वाहून आलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या गाेळा करून 'बाॅटल-बाेट' तयार केली. ही नाव इतकी मजबू्त आहे की, तिघे आरामात बसून मासेमारी करू शकतात. हा युवक 'बाॅटल-बाेट' बनवून मच्छीमारांना माेफत उपलब्ध करून देत आहे. आपल्या शहरातून प्लास्टिक नष्ट करण्यासाठी त्याने सारी संपत्ती ना नफा तत्त्वावर काम करणाऱ्या 'मदिबा अड नेचर'ला दान केली असून कॅमरून प्लास्टिकमुक्त करण्यासाठी ताे सक्रिय झाला आहे. 'बाॅटल-बाेट' बनवून आम्ही किब्री परिसरातील मच्छीमारांना माेफत पुरवत आहाेत. एक बाेट बनवण्यासाठी सुमारे १ हजार बाटल्या लागतात. त्याचे वजन २७० किलाे भरते. मच्छीमारीसाठी लागणाऱ्या साहित्यासह तिघे जण सहज बसू शकतात. एक नाव बनवण्यासाठी आठवडा लागताे. जगभरात दर मिनिटाला १ मिलियन प्लास्टिकच्या बाटल्या विकल्या जातात. २०११ मध्ये विद्यार्थिदशेत असताना मी समुद्रावर आलाे त्या वेळी वादळामुळे शेकडाे बाटल्या किनाऱ्यावर येऊन पडल्या. प्रशासनाने या बाटल्या उचलण्यात काही स्वारस्य दाखवले नाही. त्यामुळे मीच त्या उचलल्या आणि त्यापासून 'इकाे बाेट्स' बनवण्याचा विचार सुचला. इतरांना मी सांगू लागलाे त्या वेळी अनेक जण माझ्यावर हसत हाेते. परंतु काेणाचीही पर्वा न करता शहरातील बाटल्या गाेळा करू लागलाे आणि नाव बनवली. सागरी वादळात चाचणी घेण्यासाठी ही नाव घेऊन गेलाे, काहीही फरक जाणवला नाही. तेव्हापासून गरीब मच्छीमारांसाेबत स्थानिक लाेकांनादेखील ताे 'बाॅटल बाेट्स' इबाेन पुरवत असताे.इबाेनच्या या कामाची दखल घेऊन कॅमरूनियन संघटनेने 'इकाेबिन' नावाने पहिला प्लास्टिक रिसायकलिंग प्लँट सुरू केला आहे.