आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विष प्यायलेल्या रुग्णाला सलाइनच्या ऐवजी चढवली पाण्याची बॉटल, अजमेरमधील डॉक्टरांची अजब उपचार पद्धती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजमेर(राजस्थान)- येथील जवाहरलाल नेहरू हॉस्पीटलच्या इमरजंसी यूनिटमध्ये डॉक्टरांचा हलगर्जीपण समोर आला आहे. मंगळवारी एका महिलेच्या शरिरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी गेस्टिक लवाज (पोट साफ करण्याचा विधी)ची पद्धतच बदलण्यात आली. डॉक्टरांनी पाण्याच्या बाटलीलाच आयव्ही सेट (ग्लूकोजची नळी)सोबत जोडून उपचार सुरू केले.


विशेशज्ञांनी सांगितले की, विषारी पदार्थ प्यायलेल्या रुग्णांसाठी ग्लुकोजची बाटली आणि कीप (गॅस्टिक लवाज ट्यूब) चा वापर करुन पोट साफ करायला हवे. हीच शास्त्रीय पद्धत आहे, यामुळे शरिरातील विषारी पदार्थ बाहेर येतो. ज्या वेगाने पोटात पाणी जाईल, त्याच वेगाने ते बाहेर येईल. 


उपचाराची पद्धतच बदलली
रुग्णाच्या नातलगाने सांगितले की, रुग्णालाया थेट पाण्याची बाटलीच लावली. ग्लुकोजच्या बाटलीत पाणी टाकण्याऐवजी थेट आयव्ही सेटलाच पाण्याच्या बाटलीसोबत जोडून राइज टयूबमध्ये लावले आणि यातूनच ग्लुकोजप्रमाणे पाणी जाऊ लागले.


ही आहे खरी प्रक्रिया
रुग्णावर उपचार करण्यापूर्वी त्याचे पोट साफ केले जाते, म्हणजे त्याच्या शरिरात विषारी पदार्थ राहणार नाही. पोटात पाणी टाकण्यासाठी 8 ते 10 मिनरल पाण्याच्या बाटल्या आणल्या जातात. पोटाला साफ करण्यासाठी कीप विधीचा वापर केला जातो. या प्रक्रियेत एंडोस्कोपीप्रमाणे एक मोठी नळी तोंडावाटे पोटात टाकली जाते. त्यानंतर पाणी टाकले जाते, यामुळे उल्टी होऊन विषारी कण उल्टीसोबत बाहेर येतात. पण या प्रक्रियेत अनेकवेळा उल्टी ऑक्सीजन नळीत जाण्याची भीती असते. त्यामुळे रुग्ण या पद्धतीसाठी तयार होत नाहीत. सध्या गेस्टिक लवाजसाठी राइज ट्यूबच्या वापरातून उपचार केला जातो. यात रुग्णाच्या नाकावाटे पाणी पोटात पोहचवले जाते.

बातम्या आणखी आहेत...