आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाउंड्री काउंटने प्रथमच विजयाचा निर्णय; खेळाडू म्हणाले-आयसीसी आता थट्टेचा विषय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील निर्णयासाठी वापरण्यात आलेल्या आयसीसीच्या बाउंड्री काउंट नियमावरून वाद निर्माण झाला आहे. अनेक खेळाडूंनी हा  नियम तर्कहीन व हास्यास्पद असून तो बदलण्याची मागणी केली आहे. न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू स्कॉट स्टायरिस म्हणाला, आयसीसीचे उत्तम काम आता थट्टेचा विषय बनले आहे.माजी आंतरराष्ट्रीय पंच सायमन टॉफेल व के. हरिहरन म्हणाले, इंग्लंडला ओव्हरथ्रोच्या पाचऐवजी सहा धावा देणे चुकीचे आहे. या वादाबाबत आयसीसीचे प्रवक्ते मायकल गिब्सन यांनी सांगितले की, मंडळ वादाशी निगडित सर्व मुद्द्यांचा आढावा  घेईल. त्यानंतरच काही सांगता येईल.

 

2012 मध्ये निश्चित झाल्या वनडे सामना टाय झाल्यानंतरच्या विजयाच्या ३ अटी

> स्थिती-1  सामना बरोबरीत सुटल्यास सुपर ओव्हरद्वारे निर्णय
टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर होते. प्रथम फलंदाजी करणारा संघ सुपर ओव्हरमध्ये प्रथम क्षेत्ररक्षण करतो. जसे रविवारी इंग्लंडला फलंदाजी मिळाली. जुन्या चेंडूनेच गोलंदाजी होते.  2 विकेट पडल्यास डाव संपतो. प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू घेता येतो. जास्त धावा करणारा संघ जिंकतो.


> स्थिती-2  सुपर ओव्हरही टाय, तर बाउंड्रीद्वारा निर्णय
सुपर ओव्हरही टाय झाली तर संपूर्ण डावात (सुपर ओव्हरसह) जास्त बाउंड्री मारणारा संघ विजयी होतो. जसे  रविवारी इंग्लंडला विजय मिळाला.पूर्ण डावातील बाउंड्रीच्या संख्येचीही बरोबरी झाली तर सुपर ओव्हर वगळून उर्वरित डावात ज्या संघाने जास्त बाउंड्री मारल्या आहेत तो विजयी ठरतो. 


> स्थिती-3   बाउंड्रीही टाय तर सुपर ओव्हरची उलटगणती  
समजा या बाउंड्रीचीही संख्या बरोबरीत असेल तर मग सुपर ओव्हरची इनिंग पाहिली जाते. यात शेवटच्या चेंडूपासून गणना सुरू होते. शेवटच्या चेंडूवर संघाने चार धावा केल्या  आणि दुसऱ्याने सहा, तर दुसरा संघ विजयी ठरतो. मात्र धावा सारख्याच असतील तर स्थिती स्पष्ट नाही. 

 

२०११  पूर्वी विकेटच्या आधारे ठरायचा विजय 
क्रिकेटचे नियम मेरिलबोन क्रिकेट असोसिएशन (एमसीसी) बनवते. समजा दोन्ही संघांनी अंतिम सामन्यात समान धावा केल्या तर ज्यांच्या विकेट कमी पडल्या तो संघ विजयी असा नियम अनेक वर्षे होता. मात्र २०१२ मध्ये सुपर ओव्हरसह बाउंड्री काउंटचा नियम आला.

 

> मुलांनो, बेकरी काम करा किंवा दुसरे काहीही निवडा.  हसत खेळत ६० व्या वर्षी मरा, मात्र खेळाची निवड करू नका. 
- जिमी निशाम, न्यूझीलंड


> बाउंड्री काउंटच्या आधारे विजयाचा निर्णय झाला. हा नियम बिनबुडाचा आहे. दोन्ही संघाचे अभिनंदन दोघेही विजेते आहेत.
- गौतम गंभीर