आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bowman Irani's Entry In The '83' Film Will Play The Role Of Farrukh Engineer, 1983 World Cup Commentator.

'83' चित्रपटात झाली बोमन ईरानी यांची एंट्री, साकारणार आहेत 1983 वर्ल्ड कपचे कमेंटेटर फारुख इंजीनियर यांची भूमिका 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : भारतीय क्रिकेट टीमच्या पहिल्या वर्ल्ड कप विजयावर बनत असलेल्या चित्रपट '83' च्या टीममध्ये बोमन ईरानी यांची एंट्री झाली आहे. रणवीर सिंहने कबीर खान आणि बोमन यांच्यासोबत आपला एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तिघे लॉर्ड्स ग्राउंडवर दिसत आहेत. बाेमन चित्रपटात फारुख इंजीनियरचा रोल साकारणार आहेत.  
 

                           

वर्ल्ड कपदरम्यान फारूक यांना भेटले होते बोमन... 
बोमनने फारुख यांच्या रोलबद्दल मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, रोलच्या तयारीसाठी ते यावर्षी झालेल्या वर्ल्डकपदरम्यान मॅनचेस्टरमध्ये फारुख यांना भेटले होते आणि त्यांच्यासोबत त्यांच्या घरी काही दिवस घालवले होते. एवढेच नाही तर दोघांनी भारत-पाकिस्तानची मॅचदेखील सोबत पाहिली होती.  
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

कोण आहेत फारुख इंजीनियर... 
फारुख इंजीनियर यांनी भारतासाठी 46 टेस्ट खेळल्या. फारुख यांनी पहिली मॅच 1961 मध्ये इंग्लंडविरुद्ध कानपुरमध्ये खेळली होती. शेवटची टेस्ट वेस्टइंडीजविरुद्ध 1975 मध्ये मुंबईमध्ये खेळली होती. त्यांनी भारतासाठी 5 वनडे मॅचदेखील खेळल्या. 81 वर्षांच्या फारुख यांनी टेस्टमध्ये 2611 आणि वनडे मध्ये 114 धावा बनवल्या. 

बातम्या आणखी आहेत...