आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Boman Remembered His Role Of Virus In 3 Idiots, Raju Hirani Said Madhavan Sharman Joshi Became College Student In The Affair Of Aamir Khan Of Old Age

चित्रपटाला 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल बोमन यांनी केले व्हायरसचे स्मरण, राजू म्हणाले - आमिरच्या नादात माधवन-शर्मन बनले होते कॉलेज स्टुडंट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः बुधवार 25 डिसेंबर रोजी '3 इडियट्स' या चित्रपटाच्या रिलीजला दहा वर्षे पूर्ण झाली आहे. या चित्रपटामध्ये व्हायरसची भूमिका साकारणार्‍या बोमन इराणी यांनी एक फोटो शेअर करून या चित्रपटाशी संबंधित अनुभव सांगितला आहे. दुसरीकडे, त्याच्या निर्मितीशी संबंधित संस्मरणीय किस्से स्वत: राजकुमार हिरानी यांनी सांगितले आहेत.


बोमन लिहितात- ''बॉलिवूडमधील काही उत्तम प्रतिभेबरोबर काम करणे आणि सर्वात संस्मरणीय कहाण्यांपैकी एकाला जीवंत करण्याचा अनुभव मजेदार आणि अविस्मरणीय  होता. मी या कथेचा एक भाग होतो याचा मला आनंद आहे. आज आम्ही 3 इडियट्सची 10 वर्षे साजरी करीत आहोत.''

राज कुमार हिराणी म्हणतात, जेव्हा हा चित्रपट लिहिला गेला तेव्हा त्यातील तीन मेन लीडचे वय 20 ते 21 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक होते.  कास्टिंगच्या वेळी आम्ही नवीन लोकांसोबत चित्रपट बनवण्याचे ठरविले होते. काही चांगले लोक मिळालेदेखील. पण तिन्ही नायकाची भूमिका साकारणार्‍या कलाकारांमधील केमिस्ट्री मात्र चांगली जमून येत नव्हती. आम्ही तिन्ही हीरोच्या भूमिकेसाठी सहा महिने नवीन माणसे शोधत राहिलो, त्यानंतर आमिरसोबत आमची भेट झाली. चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर तो म्हणाला, त्याला ही भूमिका करायची आहे. पण तो कितपत तरुण दिसेल याबद्दल आम्ही साशंक होतो. पण, आमिरचा आत्मविश्वास होता की तो ते करेल. त्यावेळी तो 'गजनी'च्या झोनमध्ये होता, त्यामुळे त्याची बॉडी चांगली बनली होती. तरीही, त्याला खात्री होती की तो रँचोच्या भूमिकेत शिरेल. अशाप्रकारे चित्रपटात त्याची एन्ट्री झाली. त्यानंतर आम्ही आमिरच्या वयाच्या आसपासच्या इतर दोन पात्रांसाठीही कलाकार शोधू लागलो. मग माधवन आणि शर्मन यांचीही भेट झाली. उर्वरित वर्गमित्रही थोडे अधिक वय असलेले शोधले. जेणेकरून कोणताही फरक दिसणार नाही.

  • लडाखच्या बर्फवृष्टीत अडकले होते 25 क्रू मेंबर्स, स्वतः मार्ग शोधत परत आले

'क्लायमॅक्स शूट करण्यासाठी आम्ही लडाखला गेलो. अचानक तेथे प्रचंड बर्फवृष्टी झाली. आम्ही लेहपासून सुमारे सहा तासांच्या अंतरावर होतो. आम्ही दिवसभर शूट करू शकलो नाही. दुसर्‍या दिवशी करू असा विचार केला. जेव्हा मी सकाळी उठलो तेव्हा आम्ही जे लोकेशन शोधले होते, जे मैदान होते ते संपूर्ण स्थान सुमारे एक फूट बर्फाने झाकलेले दिसले. तिथे आयटीबीपी सैनिकांची छावणी होती. तेथून निघण्याची सूचना त्यांनी केली, नाहीतर एकदा बर्फ पडला तर महिनभर अडकणार होतो. आम्ही सर्वजण तिथे तंबू टाकून राहत होतो. तेथे बरेच आमच्या प्रॉडक्शनचे सामान होते. कोणाकडेही सेल फोन नव्हते. पण सॅटेलाइट फोन होते. ताबडतोब आम्ही तेथून लोकांना बाहेर काढले. कॅमेरा विभागातील 25 लोक तेछे होते, कारण त्यांच्याजवळ जड सामान होते. यामुळे ते बर्फवृष्टीत अडकले. दुसर्‍या दिवशी त्यांनी आम्हाला उपग्रह फोनद्वारे कॉल केले. म्हणाले आम्हाला येथून काढण्यासाठी काहीतरी करा. आम्ही सगळे जण खूप अस्वस्थ झालो. सैन्य व वायुसेनांकडून मदतीसाठी विचारणा केली, पण हवामान असे होते की तेदेखील काही करण्यास सक्षम नव्हते. कसे तरी करुन क्रू मेंबर्स तेथून निघाले. वाटाही चहुबाजूंनी बर्फाच्छादित होती. जो प्रवास सहा तासांचा होता तो प्रवास करायला क्रू मेंबर्सना 17 तास लागले. त्यांना अशा ठिकाणी जायचे होते जिथून मुख्य रस्ता महामार्ग दिसू लागला होता, तिथे आम्ही  होतो आणि फक्त बर्फाची चादर पसरली होती. क्रू मेंबर्सची स्थिती तिथे पोहोचेपर्यंत अतिशय बिकट झाली होती. त्यांचे नर्वस ब्रेकडाउन झाले होते. शेवटी, आम्ही तेथे शूट करू शकलो नाही. मग दुसरी जागा शोधण्यासाठी पण संपूर्ण युनिटने पाठिंबा दिला. म्हणाले की आता शूट तिथेच असेल. एक वर्षानंतर आम्ही पुन्हा त्याच ठिकाणी शूटिंग करायला पोहोचलो तर वातावरण अतिशय सुंदर होते.  आम्ही तिथे मजेत शूट केले.'

बातम्या आणखी आहेत...