आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Box Office : Ayushman's 'Dream Girl' Beats, Collection Crosses 26 Crores In Two Days

बॉक्स ऑफिस : आयुष्मानच्या 'ड्रीम गर्ल' ने मारली बाजी, दोन दिवसांत कलेक्शन पोहोचले 26 कोटींच्या पार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : आयुष्मान खुराना आणि नुसरत भरूचा अभिनित चित्रपट 'ड्रीम गर्ल' च्या पूजाची जादू चालली आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त सुरुवात केली. जिथे पहिल्या दिवशी चित्रपटाची कमाई 10.05 कोटी रुपये होती, तिथे दुसऱ्या दिवशीच्या कलेक्शनमध्ये 63.38% ने वाढ झाली आहे आणि 'ड्रीम गर्ल' ची कमाई 26.47 कोटी झाली आहे.  

तिसऱ्या दिवशीही चित्रपट करू शकतो कमाल... 
ट्रेड एनालिस्ट तरण आदर्शनुसार चित्रपट तिसऱ्या दिवशी मार्जिन बनून बाकीच्या दोन दिवसांच्या कलेक्शनपेक्षाही पुढे जाऊ शकतो. चित्रपट महानगरांमध्ये चांगला बिजनेस करत आहे.  

आयुष्मानचे टॉप 6 सर्वात मोठे ओपनर चित्रपट...
'ड्रीम गर्ल' आयुष्मान खुरानाच्या करिअरमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनर चित्रपट ठरला आहे. इतर चित्रपटांचे कलेक्शन याप्रमाणे आहे...  

  रँक      चित्रपट      पहिल्या दिवसाची कमाई
  1   ड्रीम गर्ल (2019)       10.05 कोटी रुपये
  2   बधाई हो (2018)   7.35 कोटी रुपये
  3   आर्टिकल 15 (2019)   5.02 कोटी रुपये
  4   शुभ मंगल सावधान (2017)   2.71 कोटी रुपये
  5   अंधाधुन (2018)   2.70 कोटी रुपये
  6   बरेली की बर्फी (2017)       2.42 कोटी रुपये

बातम्या आणखी आहेत...