आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Box Office : 'Chhichore' Collects Next Day 12.25 Crores, Gross Revenue Reached 19 Crores Ahead

बॉक्स ऑफिस : 'छिछोरे' ने दुसऱ्या दिवशी मारली 12.25 कोटींवर उडी, एकूण कमाई पोहोचली 19 कोटींच्या पुढे 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : श्रद्धा कपूर आणि सुशांत सिंह राजपूतचा चित्रपट 'छिछोरे' ने दुसऱ्या दिवशी 12 कोटींची कमाई केली आहे. माउथ पब्लिसिटीने चित्रपटाला फायदा झाला आणि आता हा आकडा रविवारी आणखी वाढू शकतो. चित्रपटात कॉलेज लाइफ, हॉस्टेल आणि मित्रांची कथा खूप पसंत केली जात आहे.  
 
 

35 कोटी कमवू शकतो चित्रपट... 
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शनुसार, 'छिछोरे' ने पहिल्या दिवशीच्या तुलनेत सुमारे 67.35 टक्के जास्त कमाई केली. या चित्रपटाचे कौतुकच याचा बॉक्स ऑफिस नंबर वाढवण्यात मदत करत आहे. तिसऱ्या दिवसाच्या कमाईचा अंदाज लावला तर कदाचित चित्रपट 35 कोटी रुपयांचा आकडाही पार करू शकतो.  
 
 

असे होते दोन दिवसांचे कलेक्शन... 
नीतेश तिवारीच्या दिग्दर्शनात बनलेला चित्रपट 'छिछोरे' ने पहिल्या दिवशी 7.32 कोटी रुपये कमवले होते. पण दुसऱ्याच दिवशी याची कमाई 12.25 कोटी रुपये झाली. एकूण कमाई आतापर्यंत 19.75 कोटी रुपये झाली आहे.  

बातम्या आणखी आहेत...