आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बॉईज 2'ची बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे, विकेंडला जमवला 5.11 कोटींचा विकेंड गल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

असं म्हणतात, की चित्रपटाचा विषय जितका दमदार असतो, अगदी तितकाच दमदार प्रतिसाद सिनेमा सुपरहिट करण्यामागे प्रेक्षकांचा असतो. कारण, सिनेमातील गाण्यांना आणि संवादांना डोक्यावर उचलून धरणारा प्रेक्षकंच सिनेमाचं भवितव्य ठरवत असतो. विशाल देवरूखकर दिग्दर्शित 'बॉईज २' ला देखील महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांचे भरभरून प्रेम लाभत आहे. विशेष म्हणजे अवघ्या तीन दिवसांमध्ये 'बॉईज २' ने बॉक्स ऑफिसवर ५. ११ कोटींचा कमावला आहे. ज्यात फ्रायडे ओपनिंग १.३० कोटी ,शनिवारी १.६१ कोटी आणि रविवारी २.२० कोटींचा समावेश आहे. इरॉस इंटरनॅशनल आणि एवरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत, अवधूत गुप्ते ह्यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शनअंतर्गत ५ ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानादेखील पहावयास मिळत आहे. 


या संदर्भात करण्यात आलेल्या थिएटर व्हिजीटदरम्यान प्रथमेश सरतापे नावाचा एक अनोखा चाहता सिनेमाच्या टीमला दिसला. सामान्य प्रेक्षकांनी खच्चून भरलेल्या सिनेमागृहात प्रथमेश अंध असूनदेखील 'बॉईज २' चा मनमुराद आनंद लुटत असताना त्यांना दिसून आला. त्यामुळे, सिनेमा संपल्यानंतर त्याला भेटण्याचा मोह 'बॉईज २' च्या टीमला आवरता आला नाही. सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतीक लाड या प्रमुख कलाकारांसोबत दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांनी प्रथमेशची भेट घेतली. 'बॉईज २' ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी त्याचे आभारदेखील मानले. प्रथमेश हा एक उत्तम सिनेश्रोता असून, त्याने आतापर्यंत अनेक चित्रपटांचा आस्वाद घेतला आहे. गतवर्षीचा 'बॉईज' सिनेमा त्याला भरपूर आवडला होता, आणि त्यामुळेच  त्याला 'बॉईज २' पाहण्याची इच्छा होती. 


याबद्दल बोलताना, 'चित्रपट प्रदर्शित होऊन काही दिवसंच झाले आहेत. यापुढे आमची फिल्म चालेल कि नाही आम्हाला माहित नाही, पण प्रथमेशला आमचा चित्रपट आवडला हेच आमच्या चित्रपटाचं यश आहे. चित्रपटाने कितीही कोटींचा धंदा केला, तरी प्रथमेशला झालेला आनंद हाच आमच्यासाठी सिनेमा सुपरहिट झाल्याचं प्रतीक आहे', अशी प्रतिक्रिया विशाल देवरुखकर देतात. 


सुपरहिट 'बॉईज' नंतर आता 'बॉईज २' चा देखील डंका सर्वत्र वाजत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या सिनेमाचे ३७५ शोज सुरु असून, यावर्षीच्या हिट चित्रपटांच्या यादीत 'बॉईज २' चा समावेशदेखील झाला आहे. कॉलेज तरुणाईचे भावविश्व मांडणाऱ्या 'बॉईज २' सिनेमाला ह्रिशिकेश कोळीचे संवाद लाभले आहेत. लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया यांनी 'बॉईज २' च्या निर्मात्याची धुरा सांभाळली असून, महाराष्ट्रात हाऊसफुल होत असलेल्या या सिनेमाचे इरॉस इंटरनॅशलद्वारे जागतिक वितरणदेखील केलं जात आहे.

बातम्या आणखी आहेत...